एक्स्प्लोर

पगाराएवढंच काम करा, कामानंतर मॅनेजर फोनही करू शकत नाही!, या देशानं थेट कायदाच केला..

इथल्या नवीन नियमानुसार कोणताही कर्मचारी त्याच्या ठरलेल्या तासानंतर ऑफिसच्या कामांना किंवा  त्या संदर्भात उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार देऊ शकतो. 

work life balance: कोणत्याही नोकरीत कामाचे तास ठरलेले असतात, पण खरंच आपण तेवढेच तास काम करतो का? व्हाट्सअप, ऑनलाइन मीटिंग सोशल मीडिया यासारख्या कित्येक माध्यमातून आपण कामाचे अपडेट सतत चेक करत असतो. कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये तर ओव्हरटाइमची संकल्पना नवीन नाही. पण पगार मिळतोय तेवढेच तास काम करा. तुमचे कामाचे तास भरल्यानंतर मॅनेजर फोनही करू शकत नाही असा कायदाच केला एका देशाने. कार्यालयीन वेळेनंतर कारवाईच्या कोणत्याही भीती शिवाय आणि कार्यालयीन वेळेनंतर फोन कॉल्स आणि टेक्स्ट मेसेज कडे या देशातले नोकरदार आता कायदेशीररित्या दुर्लक्ष करू शकतात. 

ऑस्ट्रेलियन कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेनंतर डिस्कनेक्ट होण्याचा अधिकार मिळालाय. ज्या देशांमध्ये असा कोणताही कायदा नाही तेथील कर्मचाऱ्यांनी फोनला उत्तर न दिल्यास किंवा त्यांना सांगितलेले काम न केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. अशी भीती वाटू नये म्हणून ऑस्ट्रेलियात आता असा कायदाच करण्यात आलाय. इथल्या नवीन नियमानुसार कोणताही कर्मचारी त्याच्या ठरलेल्या तासानंतर ऑफिसच्या कामांना किंवा  त्या संदर्भात उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार देऊ शकतो. 

ऑस्ट्रेलियन नोकरदारांना मिळाला दुर्लक्ष करण्याचा अधिकार 

कोणताही कर्मचारी सशुल्क कामाच्या तासानंतर कामाच्या संदर्भातील संदेश वाचण्यास निरीक्षण करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यास स्पष्टपणे नकार देऊ शकतो. जेव्हा लोकांना 24 तास पगार मिळत नाही तेव्हा त्यांना दिवसाच्या 24 तास काम करावे लागत नाही असं तिथला पंतप्रधानांनी अंथनी अल्बानी यांनी सांगितलंय.

ते म्हणाले अनेक ऑस्ट्रेलियन लोकांसाठी कामाच्या तासानंतर फोनवर किंवा ईमेलवर 24 तास सक्रिय असणे हे निराशा जनक आहे. काम झाल्यानंतर ही तर पुन्हा पुन्हा तपासत राहतात. ही मानसिक आरोग्याची समस्या आहे. 

असा अधिकार का दिला गेला? 

आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग आपल्या स्वतःसाठी स्वतंत्र असावा हा यामागचा हेतू असून काम आणि वैयक्तिक जीवनाचा आदर करण्यासाठी याची गरज असल्याचे तिथल्या मंत्र्यांनी सांगितलं. 

जर दुसऱ्या दिवसापर्यंत थांबता येत असेल तर कमी पगारावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर दैनंदिन कामांसाठी कार्यालयानंतर कॉलचा भार पडू नये तसेच ग्राहक सेवा कर्मचारी जाहिरात कामगार यांच्यासारख्या क्षेत्रातील अनेकांना कमी पगारात अधिक राबवण्यात येत असल्याची तक्रार अनेक दिवसांपासून येत असल्याचे सांगण्यात आले. 

वैयक्तिक कामांना चिंतामुक्त वेळ मिळेल 

ऑफिस झालं तरीही ऑफिसचे ईमेल आणि मेसेज चेक करणाऱ्यांचे प्रमाण ऑस्ट्रेलियामध्येही अधिक आहे. कोरोना नंतर ई-मेल आणि मेसेज कॉल वर बरंच काम सुरू झाल्याने तुमच्या आयुष्यासाठी चिंतामुक्त असा वेळ मिळत नाही. परिणामी कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण होतं. या परिस्थितीवर ऑस्ट्रेलियन सरकारनं थेट कायदाच केलाय.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget