एक्स्प्लोर

RBI च्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं सहकारी बँकांना दणका; ठोठावला 4 लाखांचा दंड

Reserve Bank Imposed Penalty on 4 Banks : RBI च्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं सहकारी बँकांना दणका; महाराष्ट्रातील तीन आणि मध्यप्रदेशातील एका बँकेचा समावेश

Reserve Bank Imposed Penalty on 4 Banks : आरबीआयच्या (RBI) नियमांचं पालन न केल्यानं चार सहकारी बॅंकांना दणका दिला आहे. सहकारी बँकांना नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळं तब्बल 4 लाखांचा दंड सुनावला आहे. या चार बँकांमध्ये महाराष्ट्रातील तीन तर मध्यप्रदेशातील एका बँकेचा समावेश आहे. आरबीआयनं ज्या बँकांना दंड ठोठावला आहे त्यामध्ये नाशिकमधील अंदरसूल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, लातूरमधील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक आणि मध्य प्रदेशातील जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादीत या बँकांचा समावेश आहे. 

रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांना नियमांचं पालन न केल्याबद्दल एकूण 4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेनं जारी केलेल्या चार स्वतंत्र स्टेटमेंटनुसार, हा दंड नियमांकडे दुर्लक्ष करत पालन न केल्यामुळं लावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेनं केलेल्या या कारवाईमुळे ग्राहकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं आरबीआयच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील नाशिकमधील अंदरसूल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला दीड लाख रुपये आणि लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर महाराष्ट्रातील नांदेड मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील शहडोल येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वी 5 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेनही अनेक बँकांना दंड ठोठावला होता. त्यावेळी, आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात स्पष्ट करण्यात आलं होतं की, फलटणस्थित यशवंत सहकारी बँक लिमिटेडला उत्पन्न, मालमत्ता वर्गीकरण, तरतूदी आणि इतर संबंधित समस्यांवरील निर्देशांचं पालन न केल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय अशाच एका प्रकरणात मुंबईतील कोकण मर्कंटाइल को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. दुसरीकडे कोलकातास्थित समता को. ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 16 डिसेंबर 2024: ABP MAJHADCM Eknath Shinde : श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात मंत्रिपदंNagpur Banners : विधान भवनाबाहेर नेत्यांना शुभेच्छा देणारे मोठ मोठे बॅनर्स लावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
Mumbai Crime News: फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
Embed widget