एक्स्प्लोर

Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार

Parbhani violence: परभणीतील तरुण वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणी आज परभणी बंद. आंबेडकरी जनता करणार धरणे आंदोलन. सर्वांनी केले शांततेचे आवाहन

परभणी: परभणीतील तरुण युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात आज आनंदराज आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने परभणी बंद असणार आहे. आंबेडकरी जनतेने रविवारी रात्री घेतलेल्या बैठकीमध्ये या घटनेच्या निषेधार्थ तसेच दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील मैदानामध्ये शांततेमध्ये धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

परभणी रेल्वे स्थानकाबाहेर डॉ.  बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका व्यक्तीने केली. हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, या घटनेनंतर परभणीत हिंसाचार उफाळला होता. या काळात परभणीत जाळपोळ, दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन कोठडीत त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांच्या दाव्यानुसार, सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा छातीत कळ येत असल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, असा आरोप होत आहे. आता न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. या सगळ्या प्रकरणात पोलिसांवर गंभीर दोषारोप केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यात बंद पाळला जाणार आहे.

रामदास आठवलेंची महत्त्वाची मागणी

याप्रकरणाची कठोर चौकशी होणे आवश्यक आहे. गुन्हे शाखेच्यावतीने या प्रकरणाची तपासणी करावी. मारहाण करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करावे. सोमनथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये मिळावेत. त्यासाठी रिपाईचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटेल. जे गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घ्यावेत, अशी मागणी आहे. निष्पाप लोकांना यामध्ये गुंतवू नये, ही आमची मागणी आहे. फुटेजमध्ये ज्यांचे फोटो दिसत नाहीत, त्यांच्यावर कारवाई होऊ नये, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.

सचिन खरातांकडून महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन

परभणी प्रकरणात भीमसैनिकांना अटक करण्यात आली होती. या भीमसैनिकांमध्ये 35 वर्षीय युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद शांततेने पार पडावा, असे आवाहन रिपब्लकिन पार्टी खरात गट करत असल्याचे सचिन खरात यांनी म्हटले.

परभणीत चोख पोलीस बंदोबस्त

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आज परभणी बंदची हाक देण्यात आलेली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परभणी शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप हे परभणीत असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच आज आंबेडकरी अनुयायांकडून तसेच ज्येष्ठ नेत्यांकडून शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानात धरणे आंदोलन केले जाणार आहे.

आणखी वाचा

परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको, पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना आदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget