Jio Cinema : आता OTT वर असणार मुकेश अबांनींचे राज्य, जिओ सिनेमाला टक्कर देणारे हे अॅप विकत घेणार असल्याची चर्चा
भारतीय OTT अॅप Jio Cinema ने फ्री कंटेंट उपलब्ध करून दिल्यामुळे चांगली लोकप्रियता मिळवली आहे. त्याला डिस्ने प्लस हॉटस्टारकडून आव्हान दिले जात आहे.
मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT App) आता रिलायन्सचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) राज करण्याची शक्यता असून जिओ सिनेमाचा (Jio Cinema) स्पर्धक असलेल्या डिस्ने हॉटस्टारची (Disney Hotstar) मालकी विकत घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यासंबंधी चर्चा सुरू असून डिस्ने हॉटस्टार भारतातील आपली मालकी जिओ सिनेमाला विकण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.
भारतात सध्या ओटीटी अॅप्स (OTT App) चांगलेच लोकप्रिय होत आहेत. त्यामध्ये जिओ सिनेमानेही (Jio Cinema) दमदार एन्ट्री केली. जिओ सिनेमा अॅपवरील बहुतांश व्हिडीओ विनामूल्य उपलब्ध आहेत. प्रीमियम व्हिडीओसाठी तीन महिन्यांसाठी केवळ 99 रुपये आकारण्यात येत आहेत. या वर्षीच्या आयपीएल सामन्यांचे आणि गेल्या वर्षी फिफा विश्वचषकाचे लाइव्ह स्ट्रीमिंग (Cricket Live Streeming) केल्यामुळे जिओ सिनेमाची लोकप्रियता वाढली आहे.
Disney Hotstar : हॉटस्टारने बाजी मारली
जिओ सिनेमाच्या आयपीएल सामन्यांच्या लाईव्ह स्ट्रिमिंगमुळे डिस्नेहॉटस्टारचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत डिस्ने प्लस हॉटस्टारने जिओ सिनेमाला टक्कर देत आशिया कप आणि वर्ल्ड कपचे स्ट्रीमिंगचे अधिकार विकत घेतले आहेत. पण यूजर्सची संख्या वाढवण्यासाठी हॉट स्टारला मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग करावं लागत आहे.
मुकेश अंबानी डिस्ने प्लस हॉटस्टार खरेदी करण्याच्या तयारीत
रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी डिस्ने हॉटस्टार प्लॅटफॉर्म खरेदी करण्याचा विचार (Disney Hotstar in talks with Reliance) करत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात जिओ सिनेमाची डिस्नेशी चर्चा सुरू आहे. डिस्ने आपला भारतातील व्यवसाय जिओला विकू शकते अशी चर्चा आहे. डिस्नेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर त्यांच्या भारतातील व्यवसायासाठी विविध शक्यतांची चाचपणी करत आहेत. ते डिस्ने प्लस हॉटस्टार सोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची आणि स्टार इंडिया टीव्ही चॅनल आणि डिस्ने प्लस हॉटस्टार स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म विकण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
डिस्ने हॉटस्टारचे नुकसान
ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2023 दरम्यान डिस्ने प्लस हॉटस्टारच्या सबस्क्रिप्शनमध्ये 84 लाख यूजर्सची घट झाली आहे. डिस्नेची सशुल्क सदस्यता 157.8 दशलक्ष वरून 52.9 दशलक्ष पर्यंत घसरली आहे.
क्रिकेट आणि इतर खेळाव्यतिरिक्त हॉटस्टार इंडियावर अनेक चित्रपटंही दाखवण्यात येतात. त्यामध्ये मार्वल आणि स्टार वॉर्सचे चित्रपट आणि सीरिज जास्त लोकप्रिय आहेत. तसेच हिंदी, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेतील चित्रपट आणि मालिकाही दाखवण्यात येतात.
ही बातमी वाचा: