एक्स्प्लोर

Jio AI : येत्या काळात जिओच्या माध्यमातून सर्वांना कृत्रिम बुद्धीमत्ता सेवा देणार; मुकेश अंबानींची क्रांतिकारी घोषणा

Mukesh Ambani : सात वर्षांपूर्वी देशातल्या सर्व नागरिकांना ब्रॉडबँडची सेवा देणार अशी घोषणा केली होती, ती पूर्ण झाली असं सांगत आता रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.

मुंबई: रिलायन्स उद्योग समूह आता भारतात कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) विकासाचं मॉडेल विकसित करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केली. त्या माध्यमातून भारतातील प्रत्येक नागरिकाला, कोणत्याही ठिकाणी आणि कधीही AI चा वापर करता येऊ शकेल असं कंपनीचं ध्येय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रिलायन्सच्या 46 व्या एजीएमला (Reliance AGM 2023) संबोधित करताना त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. 

रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धमत्ता तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येणार असून त्याचा सर्व नागरिक, व्यवसायिक आणि सरकारला लाभ होणार आहे. हे मॉडेल विकसित करणे हे जिओसाठी सर्वाधिक रोमांचकारी असेल असं मुकेश अंबानी म्हणाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शाश्वत पद्धती आणि हरित भविष्याचा अवलंब करताना, क्लाउड आणि एज अशा दोन्ही ठिकाणी 2,000 मेगावॅट एआय-रेडी कम्युटर कॅपॅबिलिटी निर्माण करण्याची कंपनीची वचनबद्धता असल्याचं मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केलं. 

जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रांती

जागतिक स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रांती उदयास येत आहे. त्याचा परिणाम हा जगभरातल्या अर्थव्यवस्था, उद्योग तसेच नागरिकांच्या रोजच्या जीवनावर अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात होणार आहे. त्यामुळे येत्या काळात जगाशी स्पर्धा करायची असेल तर भारतानेही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून विकास, इनोव्हेशन आणि समृद्धता वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केलं. 

देशाचा विकास आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून 

मुकेश अंबानी म्हणाले की, सर्वांना आणि सर्व ठिकाणी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचवली जाईल असं वचन मी सात वर्षांपूर्वी देशातल्या नागरिकांना दिलं होतं. आज जिओच्या माध्यमातून मी वचन देतो की येत्या काळात सर्वांना आणि सर्व ठिकाणी AI चा लाभ घेता येईल अशी सेवा जिओ विकसित करणार आहे. आपल्या देशातल्या समस्यांचे निराकरण हे AI च्या माध्यमातून केलं जाईल, AI हेच देशाच्या विकासाचं नवं माध्यम असेल. त्यामुळे देशातल्या सर्व नागरिकांना, उद्योगांना आणि सरकारला AI चा जास्तीत जास्त लाभ (Jio promises AI To Everyone, Everwhere)  कसा देता येईल याकडे रिलायन्सचा प्रयत्न असेल. 

आपल्या देशात बुद्धीमत्तेची कमतरता नाही असं मुकेश अंबानी म्हणाले. ते म्हणाले की, "येत्या काळात AI च्या विकासासाठी आपल्याला डिजिटल पायाभूत सुविधांची गरज मोठ्या प्रमाणात लागणार आहे. या क्षेत्राचा जसजसा विकास होईल तसतसे आम्ही क्लाऊड आणि एज लोकेशन्सच्या क्षमतेमध्ये 2000 मेगावॅटपर्यंत वाढ करू. येत्या पाच वर्षात रिलायन्सच्या बहुतांशी कंपन्यांमध्ये हरित उर्जेचा वापर करण्यास प्राधान्य देऊ. त्यामुळे केवळ शाश्वत विकास साधला जाणार नाही तर त्यामुळे उत्पादन खर्चही अत्यंत कमी होणार आहे." 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget