एक्स्प्लोर

Reliance Share Price: रिलायन्सचा 'हा' स्टॉक घ्या अन् मालामाल व्हा; देऊ शकतो तब्बल 24 टक्क्यांपर्यंतचा रिटर्न

Reliance Industries Share Price: मुंबई : गेल्या आठवड्यात, रिलायन्सनं गेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत, ज्यामध्ये कंपनीनं तिसऱ्या तिमाहीत 19 हजार 641 कोटी रुपयांचा नफा कमावलाय.

Reliance Industries Share Price: मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) गेल्या तिमाहीचे रिझल्ट्स समोर आले आहेत. हे रिझल्ट्स गेल्या आठवड्यात 19 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आले. त्यानंतर ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजनं (Elara Securities) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकची टार्गेट प्राईज (Reliance Industries Stock Target Price) वाढवली आहे. इलारा सिक्युरिटीजनं गुंतवणूकदारांना रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर (Reliance Industries Shares) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या लेव्हलपासून सुमारे 24 टक्क्यांच्या उसळीसह रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आलाय. 

एलारा सिक्युरिटीजनं आपल्या अहवालात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या सध्याच्या पातळीपेक्षा 24 टक्के जास्त म्हणजे, 3354 रुपयांपर्यंतचे लक्ष्य गाठण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मनं यापूर्वी 3194 रुपयांचं उद्दिष्ट दिलं होतं, ते आता 3354 रुपये करण्यात आलं आहे. 20 जानेवारी 2024 रोजी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, निकाल जाहीर झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक 0.79 टक्क्यांच्या घसरणीसह 2713 रुपयांवर बंद झाला. एलारा सिक्युरिटीजच्या आधी विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजनंही गुंतवणूकदारांना रिलायन्सचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीजनं आपल्या अहवालात म्हटलं आहे की, रिलायन्सचा शेअर 21 टक्क्यांच्या उडीसह 3125 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

शुक्रवारी, 19 जानेवारी रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजनं त्यांचे गेल्या तिमाहीतील निकाल जाहीर केले. कंपनीनं ऑईल अँड गॅस, रिटेल आणि टेलिकॉम या तिन्ही वर्टिकलमध्ये भरारी घेतल्याचं या निकालांमधून पाहायला मिळत आहे. 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचा एकूण महसूल 248,160 कोटी रुपये होता, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या त्याच तिमाहीत 240,532 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट 19,641 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत 17,706 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 44,678 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 38,286 कोटी रुपये होता.

तिसर्‍या तिमाहीत रिलायन्स रिटेलचा एकूण महसूल 83 हजार 063 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 67 हजार 623 कोटी रुपये होता. कंपनीला 3165 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. Jio Platform Limited चा महसूल 32 हजार 510 कोटी रुपये होता आणि नफा 5445 कोटी रुपये होता जो गेल्या वर्षी 4881 कोटी रुपये होता.

(टीप : वर देण्यात आलेला मजकूर केवळ माहितीसाठी देण्यात आलेला आहे. बाजारात केलेली कोणतीही गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : गृहकर्जदारांना धक्का, देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या निर्णयानं गृहकर्जाचा हप्ता वाढणार, प्रमुख बँकांचे व्याज दर जाणून घ्या
गृहकर्ज घेऊन घर खरेदीचा विचार कताय, मे महिन्यात गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Ravi Pandit Passes Away: पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान
पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान
कर्जदारांनो सावधान! कर्जाची परतफेड न केल्यास होणार मोठी कारवाई, RBI ने जाहीर केली कठोर नियमावली, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्जदारांनो सावधान! कर्जाची परतफेड न केल्यास होणार मोठी कारवाई, RBI ने जाहीर केली कठोर नियमावली, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ
Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
First EVM Election: देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? वेगळ्या कारणानं निवडणूक झालेली रद्द, पराभूत उमेदवार फेरनिवडणुकीत झालेला विजयी...
देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? 99 टक्के लोक चुकीचं उत्तर देतात...
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Suvendu Adhikari: विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
Embed widget