एक्स्प्लोर
SEBI : आयपीओ लिस्ट होण्यापूर्वी ट्रेडिंग करता येणार, सेबीचं गुंतवणूकदारांना गिफ्ट, लवकरच मोठा निर्णय घेणार
Share Market : आयपीओ बोली लावण्यास बंद झाल्यानंतर ते लिस्ट होईपर्यंतच्या काळात त्याच्या शेअरचं ट्रेडिंग करण्याचा पर्याय सेबी उपलब्ध करु देण्यासाठी प्लॅटफॉर्म सुरु करणार आहे.
आयपीओ लिस्टिंगपूर्वी ट्रेडिंग करता येणार
1/6

सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी काल (21 जानेवारी) रोजी एका कार्यक्रमात आयपीओ लिस्ट होण्यापूर्वी त्याच्या शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचं नियोजन करत असल्याचं म्हटलं.
2/6

आयपीओ बोली लावण्यास बंद झाल्यानंतर शेअर अलॉट झाल्यानंतर ते लिस्टींग होईपर्यंत गुंतवणूकदारांची संबंधित कंपनीच्या शेअरला पसंती असते. या काळात त्यांना ट्रेडिंग करायचं असल्यास कायदेशीरपणे त्यांना असं करण्याची परवानगी दिली पाहिजे, असं माधबी पुरी बुच म्हणाल्या.
Published at : 22 Jan 2025 08:38 AM (IST)
आणखी पाहा























