एक्स्प्लोर

सलग तिसऱ्या महिन्यात महागाई नरमली! सर्वसामान्यांना मोठा दिलासा, अन्नधान्याच्या किंमती नियंत्रीत राहिल्यानं महागाई दरात घट

सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. सध्या महागाई नरमली असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.

RBI  : सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. सध्या महागाई नरमली असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात महागाई आरबीआयच्या 4 टक्क्यांच्या लक्ष्याखाली आली आहे. एप्रिल महिन्यात महागाई दर 3.16 टक्के राहिला आहे. हा किरकोळ महागाई दर 6 वर्षांच्या निचांकी पातळीवर आला आहे. मार्च महिन्यात महागाई दर 3.34 टक्के राहिला होता. 

अन्नधान्याच्या किंमती नियंत्रण राहिल्याने महागाई दरात घट झाली आहे. तीव्र उन्हाचा पिकांवर परिणाम नाही अशात अन्नधान्य महागाई दर नियंत्रणात आहे. ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात 2.92 टक्के महागाई दर राहिला तर शहरी भागात 3.36 टक्के महागाई दर होता. आरबीआयकडून जून महिन्यातील पतधोरण समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेट कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सलग महागाई दर कमी राहिल्याने अधिक प्रमाणात देखील रेपो रेट कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

किरकोळ महागाई दर मोजण्यासाठी सरकारने 299 प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश

किरकोळ महागाई दर मोजण्यासाठी सरकारने 299 प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश केला आहे. यामध्ये अन्नपदार्थ, कपडे, इंधन, निवासस्थान इत्यादींचा समावेश आहे.केंद्र सरकारचे सांख्यिकी आणि कार्यक्रम  अंमलबजावणी मंत्रालय या गोष्टींच्या किमतींवरील माहिती गोळा करते आणि त्या आधारावर महागाई दराचे आकडे वेळोवेळी सादर करते.हा दर महिन्याला आणि दरवर्षी सादर केला जातो. महागाई वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत. त्यामध्ये जर वस्तू आणि सेवेची मागणी वाढल्यास त्याचा परिणाम किंमतीवर होतो आणि किंमत वाढते ती वस्तू महाग होते. एखाद्या वस्तूच्या कच्च्या मालाची किंमत वाढ, कामगार शुल्क इत्यादींमध्ये वाढ झाल्यास किंमत वाढ होते. महागाई दरात नेहमीच वाढ होते असे नाही तर काहीवेळेला दर कमीही होऊ शकतो.

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नसून गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातील, असा दावा सरकारने केला आहे.  गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात असल्याचा सरकारचा दावा देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे. अन्नधान्याच्या किंमती नियंत्रण राहिल्याने महागाई दरात घट झाली आहे. त्यामुळं देशातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Inflation : गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार, सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, सरकारचा दावा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget