एक्स्प्लोर

Inflation : गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार, सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, सरकारचा दावा

Govt on Inflation : सणासुदीच्या काळात महागाई नियंत्रणात राहील, म्हणजेच देशातील सर्वसामान्यांवर बोजा वाढणार नसल्याचा दावा सरकारने केलाय.

Govt on Inflation : भारतात (India) आता सणासुदीचा हंगाम (festive season) सुरु होणार आहे. या काळात महागाई (Inflation) वाढू नये म्हणून सरकार (Govt) प्रयत्न करत आहे. कारण या काळात महागाई वाढणार का? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. अलीकडेच सरकारने खाद्यतेल आणि इतर वस्तूंवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतल्याने महागाईत वाढ झाली होती. मात्र आता या सणासुदीच्या काळात महागाई नियंत्रणात राहील, म्हणजेच देशातील सर्वसामान्यांवर बोजा वाढणार नसल्याचा दावा सरकारने केलाय. त्यासाठी कमोडिटी उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नसून गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातील, असा दावा सरकारने केलाय. उल्लेखनीय आहे की अलीकडेच सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता बळावली आहे. पण, गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात असल्याचा अन्न ग्राहक मंत्रालयाचा दावा दिलासा देणारा आहे. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, मंगळवारीच खाद्यतेल कंपन्यांना तात्काळ किंमती वाढवू नयेत असे सांगण्यात आले आहे.

 कस्टम ड्युटीत किती वाढ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नुकतेच कच्च्या आणि शुद्ध तेलावरील कस्टम ड्युटी (खाद्य तेलांवर) वाढवली आहे. सूर्यफूल तेल, पामतेल आणि सोयाबीन तेलावर ही वाढ करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत, कस्टम ड्युटीमध्ये बदल केल्यानंतर, नवीन दर 14 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे. क्रूडवर बेसिक कस्टम ड्युटी 0-20 टक्के आहे, तर रिफाइंड तेलावर ते आता 12.5-32.5 टक्के आहे. बेसिक कस्टम ड्युटीमध्ये वाढ केल्यानंतर आता क्रूड ऑईल आणि रिफाइंड ऑइलवरील प्रभावी ड्युटी अनुक्रमे 5.5 टक्क्यांवरून 27.5 टक्के आणि 13.75 टक्क्यांवरून 35.75 टक्के होईल.

जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहणार

या उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांना किंमती वाढवू नयेत, असे निर्देश देण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. प्रयत्नांना यश आल्यास या सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहतील असं सरकारनं म्हटलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, उद्योगात 30 लाख टन खाद्यतेल शून्य शुल्कावर आयात केले जाते, जे 45 ते 50 दिवसांच्या घरगुती वापरासाठी पुरेसे आहे.  मंगळवारी केंद्र सरकारने खाद्यतेल संघांना 0 टक्के आणि 12.5 टक्के ​​बेसिक कस्टम ड्युटीवर आयात केलेल्या खाद्यतेलाचा साठा उपलब्ध होईपर्यंत तेलाची MRP स्थिर ठेवण्याचा सल्ला दिला होता. सरकार गहू खुल्या बाजारात विकणार नाही, सध्या व्यापाऱ्यांकडे 100 लाख टन गहू उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या:

Edible Oil : सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ

 

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget