एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

EMI : सर्वसामान्यांच्या कर्जाचा हप्ता कमी होणार? RBI 8 फेब्रुवारीला रेपो दर कमी करणार का? SBI चा अहवाल काय सांगतोय

RBI MPC Meeting : RBI ने 23 फेब्रुवारी 2023 रोजी रेपो दरात शेवटची वाढ केली होती. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत, RBI ने व्याजदर 4 टक्क्यांवरून 6.50 टक्के केले होते.

RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (RBI) पतधोरण आढाव्याला 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असून त्यामध्ये रेपो दरात (Repo Rate) बदल करून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचवेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या Ecowrap अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये आरबीआय या तिमाहीतही रेपो दरात काहीही बदल करण्याची शक्यता नसल्याचं सांगितलं आहे. तसेच ही परिस्थिती जूनपर्यंत कायम राहणार असून त्यानंतर रेपो दरात काहीसा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
RBI इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दराला रेपो दर म्हणतात. त्यामध्ये जर घट केली तर सर्वसामान्यांच्या कर्जाचा हप्ता कमी होतो. SBI रिसर्चच्या अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) फेब्रुवारीच्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरासंबंधित कोणताही बदल करणार नसल्याची शक्यता आहे.

डिसेंबरमध्ये रेपो दर जैसे थे

डिसेंबरच्या बैठकीत RBI ने पॉलिसी रेट 6.5 टक्के ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला होता. SBI रिसर्चच्या Ecowrap अहवालानुसार, RBI फेब्रुवारीच्या धोरणात्मक बैठकीतही व्याजदरात कोणताही बदल करणार नाही. मंगळवार 6 फेब्रुवारीपासून आरबीआयची बैठक सुरू होत आहे. ही बैठक 8 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून त्या दिवशी आरबीआय आपला निर्णय जाहीर करणार आहे.

जूनपूर्वी रेपो दरात बदल शक्य नाही

एसबीआयच्या अहवालात असं म्हटलं आहे की, जून 2024 पासून रेपो दरात पहिली कपात होऊ शकते किंवा ते ऑगस्ट 2024 पर्यंत पुढे ढकलले जाऊ शकते. सरासरी कोअर चलनवाढ (अन्न आणि इंधन वगळून CPI), जी 2021 आणि 2022 दरम्यान खूप स्थिर होती (सरासरी 6 टक्के), 2023 मध्ये झपाट्याने घटून 5 टक्के झाली आहे. 
एसबीआयचा रिसर्च अहवाल सांगतो की, ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI हा आर्थिक वर्ष 2024 मध्ये 5.4 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4.6 टक्के ते 4.8 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. 

शेवटची वाढ फेब्रुवारी 2023 मध्ये

RBI ने 23 फेब्रुवारी 2023 रोजी रेपो दरात शेवटची वाढ केली होती. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत, RBI ने व्याजदर 4 टक्क्यांवरून 6.50 टक्के केले होते. महागाई रोखण्यासाठी आरबीआयने हे केले. फेब्रुवारी 2023 मध्ये, आरबीआयने दर 25 बेसिस पॉइंट्सने वाढवले ​​होते. तेव्हापासून 5 बैठका झाल्या. मात्र कोणताही बदल दिसला नाही. या बैठकीतही व्याजदरात कोणताही बदल न झाल्यास सलग सहाव्यांदा असे होणार आहे.

फेडने देखील व्याजदर कायम ठेवला

आपल्या जानेवारीच्या बैठकीत, यूएस फेडरल रिझर्व्हने सलग चौथ्यांदा प्रमुख व्याजदर 5.25 ते 5.50 टक्के इतका गोठवला. यूएस मॉनेटरी पॉलिसी कमिटीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की अलीकडील निर्देशक हे दर्शवतात की आर्थिक क्रियाकलाप एक ठोस वेगाने वाढत आहे. कोविडनंतर चलनवाढीविरुद्धच्या लढाईत, यूएस फेडने व्याजदर जवळजवळ शून्यावरून आता 5.25 ते 5.50 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. यापूर्वी यूएस फेडने 2024 मध्ये व्याजदर तीन वेळा कमी केले जातील असे सांगितले होते. यूएस फेड जानेवारीपासूनच याची सुरुवात करेल अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढावCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय; ते काय करतील सांगता येत नाहीSanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Mahayuti Government: गृहमंत्रीपदी डॅशिंग नेता हवा, अर्थखात्याचा कारभारही सक्षम माणसाच्या हातात हवा; शिंदे गटाच्या नेत्याने शड्डू ठोकला
भाजपला मुख्यमंत्रीपद गेल्यास गृहमंत्रीपद आमच्याकडे, हा नैसर्गिक नियम; शिंदे गटाच्या नेत्याने शड्डू ठोकला
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget