एक्स्प्लोर

RBI Repo Rate :  रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर, घेतला 'हा' निर्णय

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँक या पतधोरणात मोठा निर्णय घेण्याची शक्यता होती. मात्र, ती फोल ठरली.

RBI Repo Rate: :   रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले असून रेपो दरात कोणताही बदल केला नाही. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.35 इतका ठेवण्यात आला आहे.महागाई दर आणि वाढत्या कच्च तेलाच्या किंमती पाहता, देशांतर्गत चलनवाढीच्या स्थितीबाबत मध्यवर्ती बॅंकेच्या आकलनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. आरबीआयकडून रिर्व्हस रेपो दरता बदल केले जातील असे म्हटले जात होते. रिझर्व्ह बँकेने येत्या आर्थिक वर्षात विकास दर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला.

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले की, जागतिक बाजारपेठेत कोरोना महासाथीच्या आजारामुळे अनेक आव्हाने समोर आली. भारतालादेखील अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी आरबीआयनेदेखील मोठी भूमिका बजावली आहे. आता कोरोना महासाथीला पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सलग 10  व्यांदा व्याज दरात कोणताही बदल नाही

डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले होते. त्यावेळी सलग 9 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला होता. आताही रेपो दर कायम ठेवण्यात आला आहे.   

कच्च्या तेलाचे दर वधारल्याने चिंता

मागील काही महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढत आहे. अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. त्यामुळे संबंधित देशांच्या मध्यवर्ती बँकेंकडून व्याजदर वाढवण्यात आले आहे. कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने महागाईचा भडका उडण्याचा धोका आहे. 

 

RBI Repo Rate :  रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर, घेतला 'हा' निर्णय

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावीVishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Embed widget