मुख्यपृष्ठव्यापार-उद्योगGDP Growth Projection: येत्या आर्थिक वर्षात जीडीपी 7.8 टक्के राहण्याचा अंदाज : शक्तिकांत दास
GDP Growth Projection: येत्या आर्थिक वर्षात जीडीपी 7.8 टक्के राहण्याचा अंदाज : शक्तिकांत दास
GDP Growth Projection RBI Monitoring Policy:रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले आहे.आर्थिक वर्ष 2022-23मध्ये जीडीपी 7.8 टक्के राहण्याचा अंदाज देखील RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.
By : abp majha web team | Edited By: निलेश झालटे | Updated at : 10 Feb 2022 10:37 AM (IST)
RBI Monetary Policy 2022 real GDP growth projected 7.8 percent FY 2022-23
RBI Monitoring Policy:रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून सलग 10 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केला नाही. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. दरम्यान आर्थिक वर्ष 2022-23मध्ये जीडीपी 7.8 टक्के राहण्याचा अंदाज देखील आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.
रिव्हर्स रेपो दर 3.35 इतका
पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.35 इतका ठेवण्यात आला आहे.महागाई दर आणि वाढत्या कच्च तेलाच्या किंमती पाहता, देशांतर्गत चलनवाढीच्या स्थितीबाबत मध्यवर्ती बॅंकेच्या आकलनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. आरबीआयकडून रिर्व्हस रेपो दरता बदल केले जातील असे म्हटले जात होते.
सलग 10 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल नाही
डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले होते. त्यावेळी सलग 9 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला होता. आताही रेपो दर कायम ठेवण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला होता. या आर्थिक सर्वेक्षणात अहवालात पुढील आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 8 ते 8.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. कोरोना महासाथीच्या आजाराची लाट व इतर अडथळे न आल्यास हा अंदाजित विकास दर गाठता येईल असे केंद्रीय अर्थ खात्याने आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद केले आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार यंदाच्या आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 9.2 टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील वर्षी देशाची अर्थव्यवस्था वाढीसाठी काही घटक मुख्यत: कारणीभूत ठरणार आहेत. यामध्ये कोरोना लसीकरण, निर्यातीत वाढ, नियमांमध्ये करण्यात येणारे बदल आदींमुळे जीडीपी वाढू शकतो. त्याशिवाय खासगी क्षेत्राकडून होणारी गुंतवणूक अर्थव्यवस्था वाढीसाठी हातभार लावू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha