Repo Rate : तुमचा कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार? रेपो दराबाबत मिळाले 'हे' संकेत
Repo Rate : 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या तीन दिवसीय बैठकीत मध्यवर्ती बँक पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते. पण यावेळी आरबीआय मागील वेळेपेक्षा कमी रेपो दर वाढवेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
![Repo Rate : तुमचा कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार? रेपो दराबाबत मिळाले 'हे' संकेत rbi likely to hike repo rate in monetary policy meeting Repo Rate : तुमचा कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार? रेपो दराबाबत मिळाले 'हे' संकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/05/7c3d2f5ef1753bdb9c3789e9f2f9a1d71670249475835328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक आजपासून सुरू झाली आहे. 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या तीन दिवसीय बैठकीत मध्यवर्ती बँक पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते. पण यावेळी आरबीआय मागील वेळेपेक्षा कमी रेपो दर वाढवेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. एमपीसीच्या मागील तीन बैठकांमध्ये प्रत्येक वेळी व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. यावेळी मध्यवर्ती बँक व्याजदरात 0.25 ते 0.35 टक्क्यांनी वाढ करू शकते.
यावेळी रेपो दरात वाढ करण्याबाबत मध्यवर्ती बँकेने मवाळ भूमिका स्वीकारण्याची अनेक कारणे आहेत. देशात महागाई कमी झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. मात्र, देशातील महागाईचा दर अजूनही रिझर्व्ह बँकेच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे. याशिवाय अनेक रेटिंग एजन्सींनी भारताच्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज कमी केला आहे. व्याजदरात वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत आणखी सुस्ती येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
35 बेसिस पॉइंट्स वाढ
डिसेंबरच्या बैठकीत रिझर्व्ह बँक रेपो दरात 35 आधार अंकांनी वाढ करू शकते. या कॅलेंडर वर्षाच्या अखेरीस रेपो दर 6.25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असं ड्यूश बँकेचे अर्थतज्ज्ञ कौशिक दास म्हणतात तर अर्थतज्ज्ञ राहुल बाजोरिया म्हणतात की, भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कर्जावर अवलंबून आहे. व्याजदरात झालेल्या वाढीचा त्याच्याशी खूप संबंध आहे. कमोडिटीच्या किमतीत झालेली घट आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी पाहता यावेळी रेपो दरात कमी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीतही दर वाढवण्यात येणार आहेत. मात्र, ही वाढ केवळ 0.25 ते 0.35 टक्के असेल. या आर्थिक वर्षात रेपो दर 6.5 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो असाही काही जाणकारांचा अंदाज आहे.
मे पासून 1.90 टक्के वाढ
देशांतर्गत घटकांव्यतिरिक्, एमपीसी यूएस फेडरल रिझर्व्हचे अनुसरण करू शकते, ज्याने या महिन्याच्या शेवटी दरांमध्ये सामान्य वाढ दर्शविली आहे. रिझर्व्ह बँकेने या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. मात्र, असे असतानाही जानेवारीपासून महागाई 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीवर राहिली आहे.
महत्वाच्या बातम्या
Fuel Price: कच्च्या तेलाचे दर घसरले...निवडणुका संपल्या...पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)