पंतप्रधान मोदींनी NIRYAT पोर्टल केले लॉन्च, विदेशी व्यापाराला येईल वेग
Niryat Portal: भारत गेल्या काही दशकांपासून अर्थव्यवस्थेतील परकीय व्यापाराचे योगदान वाढवण्यावर भर देत आहे. सरकारने यापूर्वीच या दिशेने अनेक सुधारणा केल्या आहेत.
Niryat Portal: भारत गेल्या काही दशकांपासून अर्थव्यवस्थेतील परकीय व्यापाराचे योगदान वाढवण्यावर भर देत आहे. सरकारने यापूर्वीच या दिशेने अनेक सुधारणा केल्या आहेत. आता विदेशी व्यापाराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवीन निर्यात पोर्टल लाँच केले. या पोर्टलवर भारताच्या परदेश व्यापाराशी संबंधित सर्व माहिती म्हणजेच आयात आणि निर्यात एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. विदेशी व्यापाराला चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
निर्यात पोर्टलवरून परकीय व्यापारासाठी हे आहेत फायदे
यासोबतच पंतप्रधान मोदींनी वाणिज्य भवनाचे उद्घाaटनही केले आहे. ही नवीन इमारत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे केंद्र असेल. निर्यात पोर्टलबद्दल बोलायचे तर, परदेशी व्यापाराशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी प्रदान करण्यासाठी हे तयार केले गेले आहे. परदेशी व्यापारात गुंतलेल्या सर्व पक्षांसाठी माहितीसाठी हे एक-स्टॉप व्यासपीठ असेल. याचे पूर्ण नाव नॅशनल इम्पोर्ट-एक्सपोर्ट रेकॉर्ड फॉर अॅनालिसिस ऑफ ट्रेड (National Import-Export Record for Yearly Analysis of Trade) आहे.
निर्यात पोर्टल आणि वाणिज्य भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही आत्मनिर्भर भारताच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात. हे व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात विशेषतः एमएसएमईसाठी सकारात्मक बदल घडवून आणतील. जे लोक व्यापार, वाणिज्य आणि एमएसएमई क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना नवीन वाणिज्य इमारतीचा लाभ मिळेल. ते म्हणाले, आज सर्व मंत्रालये, सर्व विभाग निर्यातीला चालना देण्यास प्राधान्य देत आहेत. एमएसएमई मंत्रालय असो की परराष्ट्र मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय, सर्व एकाच ध्येयासाठी एकत्र काम करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत भारताच्या निर्यातीत झपाट्याने वाढ झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मे 2022 मध्ये भारताने 37.29 अब्ज डॉलरची निर्यात केली. एक वर्षापूर्वी म्हणजेच मे 2021 मध्ये भारताने 32.30 अब्ज डॉलरची निर्यात केली होती. याचा अर्थ भारताच्या निर्यातीत एका वर्षात 15.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिल्यांदा भारताने 2021-22 मध्ये एकाच आर्थिक वर्षात (FY22) 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात लक्ष देखील गाठले आहे.