एक्स्प्लोर

मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला, देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली

Ratan Tata : रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले.

Ratan Tata , मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,  रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कँसर रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा यांच्यासोबत अनेकदा भेटीची संधी मला प्राप्त झाली. मुख्यमंत्री असताना राज्यात व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची निर्मिती आम्ही केली, त्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. अतिशय सक्रिय राहून त्यांनी राज्य सरकारसोबत काम केले होते. त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे आयोजन केले, तेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात आम्ही नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची स्थापना केली, तेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अनमोल 'रतन'! हिमालयाला हुंदका, साधेपणावर देश फिदा, भारतीय उद्योग जगताचा पितामह, रतन टाटांची कारकीर्द बघा, सलाम ठोकाल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

National Television Award ABP Majha | नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये ABP माझाचा डंकाNarendra Modi : काँग्रेस कुटुंबानं संविधानाला धक्का दिला इंदिरा गांधींच्या निर्णयांवर मोदींची टीकाOne Nation one election | एक देश एक निवडणूक! घटना दुरुस्तीत तरतुदी काय असतील? Special ReportSpecial Report One Nation One Election : एक देश एक निवडणूक! नव्या तरतुदी काय असतील?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिपदाचं पहिलं नाव समोर, सुनील तटकरेंचा नरहरी झिरवाळ यांना फोन
दादांच्या राष्ट्रवादीतील पहिलं नाव समोर, नरहरी झिरवाळ यांना सुनील तटकरेंचा शपथविधीसाठी फोन
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
Embed widget