Pune Richest Man: पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? नेमकी किती त्यांची संपत्ती...
आज आपण पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल माहिती पाहणार आहोत. हा व्यक्ती भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
Pune Richest Man: भारतातील 100 श्रीमंतांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुकेश अंबानी हे पहिल्या क्रमांकावर आहेत तर केपी रामासामी हे 100 व्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी आणि केपी रामासामी यांच्या संपत्तीत खूप फरक आहे. मात्र, आज आपण पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल माहिती पाहणार आहोत. हा व्यक्ती भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. तर पुण्यतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या (Forbes) 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पूनावाला हे सहाव्या क्रमांकावर आहे. 1966 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे आहे. सीरम दरवर्षी गोवर, पोलिओ आणि फ्लूसह लसींचे 1.5 अब्ज पेक्षा जास्त डोस तयार करते.
कोविड लस तयार करण्यात कंपनीची मोठी भूमिका
सीरमचे सीईओ आणि सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने कोविड-19 लस तयार करण्यासाठी नवीन कारखाना तयार करण्यासाठी 800 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती. त्यांनी बनवलेली लस Covishield ही महामारीच्या काळात भारतात सर्वाधिक वापरली गेलेली लस आहे.
सायरस पूनावाला यांची मालमत्ता
या कंपनीशिवाय, पूनावाला यांच्या मालमत्तेत फायनान्स सर्व्हिसेस फंड पूनावाला फिनकॉर्पमधील बहुसंख्य भागभांडवल तसेच पुण्यातील रिट्झ-कार्लटन हॉटेलमधील भागभांडवल यांचाही समावेश आहे. फोर्ब्सच्या मते, सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती 20.9 अब्ज डॉलर आहे.
कोरोना महामारीनंतर संपत्ती झपाट्याने वाढली
Covishield लसीचा विकास आणि वापर केल्यानंतर, भारतातील सहाव्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. 2020 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 8.2 अब्ज डॉलर्स होती आणि 2022 मध्ये त्यांची संपत्ती 24.3 अब्ज डॉलर्स झाली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या संपत्तीत 4 अब्ज डॉलरहून अधिक घट झाली आहे.
फोर्ब्सच्या यादीत प्रथम क्रमांकावर मुकेश अंबानी
भारतातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत रामासामी हे 100 व्या क्रमांकावर आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. आता तुम्ही विचार करत असाल की या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, नेहमीप्रमाणेच यावेळीही रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर असून एचसीएलचे संस्थापक शिव नाडर हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: