एक्स्प्लोर

जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी

पुण्यातील स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीनं जपानच्या शार्प इंडिया कंपनीची मालकी मिळवली आहे. या कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेची मालकी 75 टक्के असेल.

मुंबई : 1990 च्या दशकात भारतामध्ये जपानच्या शार्प टीव्हीचा एक वेगळा दबदबा होता. जपानी गुणवत्तेच्या चांगल्या पिक्चर क्वालिटीमुळे शार्प टीव्हीला भरपूर मागणी होती. पण नंतरच्या स्पर्धेच्या काळात ही कंपनी मागे पडली. जपानची ही शार्प इंडिया कंपनी आता मराठी माणसाने ताब्यात घेतलीय. पुण्याच्या चंद्रकांत गायकवाड यांच्या स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने काल जपानमध्ये शार्प कंपनीसोबत शेअर ॲग्रीमेंट करार केला आणि 75 टक्के शेअर्स विकत घेतले. ज्यामुळे आता पुणेस्थित असलेल्या या जपानच्या कंपनीवर मराठी माणसाची मालकी असणार आहे. सध्या या कंपनीत 80 कर्मचारी काम करत असून या कर्मचाऱ्यांची जबाबदारीही स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने घेतली आहे. स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी ही हाऊस किपिंग, मॅन पॅावर सप्लायसह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल दीड हजार कोटी रुपयांची आहे.

शार्प कंपनीवर ताबा मिळवल्याने स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीचा विस्तार वाढला असून येत्या काळात सेमीकंडक्टर निर्माण करण्याच्या क्षेत्रातही कंपनी पाऊल टाकणार आहे. तसंच शार्प कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पुन्हा एकदा प्रत्येक भारतीयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न कंपनीचा असणार आहे. 

कोण आहेत चंद्रकांत गायकवाड?

फॅसिलिटी मॅनेजमेंट आणि मॅन पॅावर सप्लाय क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव. दीड हजार कोटी रूपयांचा टर्नओव्हर असलेल्या स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीचे ते सर्वेसर्वा….महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांमध्ये सुमारे 40 हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी त्यांच्या याच कंपनीमार्फत सेवा बजावतात. केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादीत न राहता राजस्थान, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्लीसह इतर 10 राज्यांतही त्यांच्या कंपनीचा विस्तार झाला आहे. त्यांची ही  सध्याची प्रगती नजरेत भरणारी असली तरी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास मात्र संघर्षाने भरलेला आहे.

पुण्यात एका सामान्य कुटुंबातील त्यांचा जन्म …वडिल एका शाळेत शिपाई, आई गृहिणी आणि हे चार भावंडे…घरची आर्थिक स्थिती तशी बेताची असल्याने दहावीनंतरचे शिक्षण त्यांना पार्ट टाईम काम करतच पूर्ण करावे लागले. ॲाफिस बॅाय, असिस्टंट अशी पडेल ती कामं तेव्हा करावी लागली. परंतु शिकण्याची जिद्द असल्याने त्यांनी कायद्याची पदवी पूर्ण करत 2003 ला स्वतःची प्रॅक्टीस सुरू केली आणि 2005 ला कन्सल्टन्सी फर्म सुरू केले.

एका मराठी उद्योजकाकडून प्रेरणा घेत 2009 मध्ये त्यांनी ब्रिस्क कंपनी सुरू करत फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रात पाऊल टाकले.विविध महापालिका आणि राज्य सरकारच्या विविध विभागांत कामे सुरू असली तरी 2021-22 पर्यंत कंपनीची वार्षिक उलाढाल शंभर सव्वाशे कोटीपर्यंतच होती. यानंतर मात्र कंपनीने फॅसिलिटी मॅनेजमेंट बरोबरच मॅन पॅावर सप्लाय, मेडिकल इक्विपमेंट सप्लाय सारख्या क्षेत्रात काम करत व्यवसायाच्या कक्षा रूंदावल्या. दरम्यानच्या काळात ब्रिस्क कंपनीचे नामांतर स्मार्ट सर्व्हिसेस असं करण्यात आले.चंद्रकांत गायकवाड यांनी बॅंकिंग क्षेत्रातही पाऊल टाकले असून जयोस्तुते कॅपिटल ही एनबीएफसी त्यांनी सुरू केलीय.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget