एक्स्प्लोर

PSU Bank Privatisation: बँक ऑफ महाराष्ट्रसह चार बॅकांच्या खासगीकरणाचा विषय केंद्र सरकारच्या अजेंड्यावर?

बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया या चार बँकाचा खासगीकरणाचा विषय केंद्र सरकारच्या अजेंड्यावर आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या अजेंड्यावर बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडियासहित चार बँकांच्या खासगीकरणाचा विषय असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या चार बँकांना केंद्र सरकारने शॉर्टलिस्ट केलं असून यांचं लवकरच खासगीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया या चार बँकाचा खासगीकरणाचा विषय केंद्र सरकारच्या अजेंड्यावर आहे. या चार बँकापैकी दोन बँकांचे खाजगीकरण हे 2021-22 या आर्थिक वर्षात केलं जाण्याची शक्यता आहे.

सरकारने अधिकृतरीत्या खासगीकरण करण्यात येत असलेल्या बॅंकांची नावे जाहीर केली नाहीत. या बँकांची कर्मचारी संख्या, कामगार संघटनांचा दबाव आणि या संबंधीचे राजकारण या सर्वांचा विचार करुन केंद्र सरकार अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

ICICI बँकेचे माजी सीईओ चंदा कोचर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडनं जामीन मंजूर

बॅंकिंग क्षेत्राच्या खासगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केंद्र सरकार लहान आणि मध्यम बँकांतील आपला हिस्सा खाजगी क्षेत्राला विकण्याचा विचार करत आहे. येत्या काळात याच सूत्राचा वापर करुन मोठ्या बँकांतील सरकारी हिस्साही विकण्यात येणार आहे. केवळ स्टेट बँक ऑफ इंडियातील आपली हिस्सेदारी केंद्र सरकार ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या योजना राबवता येतात.

बँकाच्या खाजगीकरणातून मिळालेल्या महसूलाचा वापर करुन केंद्र सरकार विविध योजना राबवण्याचा विचार करत आहे. सध्या बँकिंग क्षेत्रात केंद्र सरकारची हिस्सेदारी मोठी आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास 50 हजार कर्मचारी काम करतात. सेन्ट्रल बँक ऑफ इंडियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 33 हजार इतकी आहे. इंडियन ओव्हरसीज बँक 26 हजार कर्मचारी तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 13 हजार कर्मचारी काम करतात. या कारणामुळे केंद्र सरकार सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्राचे खाजगीकरण करण्याची शक्यता आहे. कारण या बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने या बँकेच्या खाजगीकरणाला कमी विरोध होण्याची शक्यता आहे.

डिजिटल पेमेंट, बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांच्या तक्रारींसाठी एकच नंबर, आरबीआयची घोषणा

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Embed widget