Price Hike: दिवाळीनंतर टीव्ही, फ्रीज, एसीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
Price Hike:कोरोना महामारीमुळे (Coronavirus) देशावर आर्थिक संकट ओढावले आहे. देशात पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅससह अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली.
Price Hike: कोरोना महामारीमुळे (Coronavirus) देशावर आर्थिक संकट ओढावले आहे. देशात पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅससह अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली. दरम्यान, दिवाळीचा सणाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात नव्या वस्तूंची खेरदी केली जाते. मात्र, यावर्षी टीव्ही (TV), फ्रिज (Fridges) किंवा एसी (AC) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, पुढील माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. दिवाळीनंतर टीव्ही, फ्रिज आणि एसीच्या किमंतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिवाळीनंतर टीव्ही, फ्रिज आणि एसीसह इतर कंज्यूमर ड्युरेबल्स कंपनीच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, मागील काही दिवसांपासून स्टील, कॉपर आणि एल्युमिनिअमच्या किंमतीत वाढ झाली. ज्यामुळे कंज्यूमर ड्युरेबल्स कंपनींसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीने आणखी भर घातली. डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने मालाची वाहतूकही महाग झाली आहे. त्यामुळे या कंपन्यांकडे दरवाढ करण्याशिवाय पर्याय उरला नाही. सेमीकंडक्टर चिपचा तुटवडाही या कंपन्यांना त्रासदायक ठरत आहे.
या दिवाळीला अधिक विक्री होईल, या हेतूने कंज्यूमर ड्युरेबल्स कंपनींने त्यांच्या वस्तूच्या किमती वाढवल्या नव्हत्या. याचा कंपनींच्या नफ्यावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. यामुळे दिवाळीनंतर कंज्यूमर ड्युरेबल्स कंपन्यांच्या वस्तूंच्या किमतीत सात ते दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून वस्तूंच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, अनेक कंज्यूमर ड्युरेबल्स कंपन्या चीनमधून वस्तूंची आयात करतात. चीनमधून येणारे मालवाहतूक शुल्क 5 पटीने महाग झाले आहे. यामुळे दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने दरवाढीची प्रक्रिया सुरू होईल.
ॉदरम्यान, दसऱ्यानिमित्त कंज्यूमर ड्युरेबल्स कंपनींनी त्यांच्या वस्तूंची मोठी विक्री केली. यात ई-कॉमर्स कंपनींच्या कंपन्यांचा मोठा वाटा आहे. नवरात्रीमध्ये एसी, टीव्ही, फ्रीजला चांगली मागणी होती. यामुळे धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावरही चांगली विक्री होऊ शकते. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई कॉमर्स कंमन्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु केलला सेल अजूनही सुरु आहे. दिवाळीनंतर ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
संबंधित बातम्या-