खुषखबर! सोनं झालं स्वस्त, 10 ग्रॅम सोन्याच्या खरेदीसाठी किती पैसे द्यावे लागणार?
सोन्याची (Gold) खरेदी करण्याऱ्यांठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
Gold Price : सोन्याची (Gold) खरेदी करण्याऱ्यांठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. दिवसेंदिवसं सोनं महाग होत असल्याचे दिसत होते. मात्र, गेल्या दोन दिवसापासून दरात घसरण होत आहे. त्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आता दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 72,960 रुपयांवर आला आहे. तर चांदीचा दर हा 87,300 रुपये किलो आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ
दरम्यान, एका बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतात सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतात सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झालीय. त्यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या घसरणीनंतर देशातील विविध शहरांमध्ये सोन्याचा दर हा 73 हजार रुपयांच्या खाली आला आहे.
दिल्लीत सोन्याच्या दराची काय स्थिती?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव देशभरात सरासरी 400 रुपयांनी घसरला आहे. तर दिल्लीत सोने 430 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त झाले आहे. त्यानंतर दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,970 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली आहे. त्यानंतर किंमत 66,900 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आली आहे. गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईत सोन्याच्या दराची काय स्थिती?
मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आता अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 66,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्याला किती दर?
शहर 22 कॅरेट सोने 24 कॅरेट सोने
चेन्नई - 66,890 72,970
कोलकाता - 66,740 72,810
गुरुग्राम - 66,890 72,960
बंगळुरु - 66,740 72,810
हैदराबाद - 66,740 72,810
महत्वाच्या बातम्या: