लसणाला मिळतोय 'दराचा तडका', कुठं 400 तर कुठं 500 रुपयांचा दर; सर्वसामान्यांना फटका तर बळीराजाला फायदा
सध्या लसणाच्या दरात (Garlic Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. लसणाचा दर हा 400 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.
Garlic Price: सध्या लसणाच्या दरात (Garlic Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. लसणाचा दर हा 400 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तर काही ठिकाणी लसणारा दर हा 450 ते 500 रुपये प्रतिकिलोवर पोहचला आहे. यामुळं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, एकीकडं सर्वसामान्यांना जरी लसूण महाग झाला असेल तरी ज्या शेतकऱ्यांकडे (Farmers) लसूण आहे, त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचं चित्र दिसत आहे.
15 दिवसात दरात मोठी वाढ
दरम्यान, एकीकडं देशात कांदा-बटाटा यांसारख्या इतर भाज्यांचे भाव कमी झाले असले तरी भाजीपाल्यातील फोडणी मात्र महाग झाली आहे. होय, कोलकाता ते अहमदाबाद एक किलो लसणाचा भाव 450 ते 500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. देशात लसणाच्या दरात झालेली वाढ ही अवघ्या 15 दिवसात झाली आहे. या काळात 200 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या लसणाचा भाव 300 रुपयांवरुन 500 रुपयांपर्यंत आले आहेत. आठवडाभरापूर्वी 300 रुपये किलोनं विकला जाणारा लसूण आता 500 रुपयांवर गेला आहे. दरम्यान, कोलकाता येथे 15 दिवसांपूर्वी 200 ते 220 रुपये दराने विकला जाणारा लसूण आता 500 रुपयांना विकला जात असल्याची विक्रेत्यांनी दिली आहे.
या शहरात सलणाच्या दरात मोठी वाढ
यावर्षी लसूण उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं दरात वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. बाजारपेठेतील बहुतांश पुरवठा पश्चिम बंगालच्या बाहेरुन येतो. मुख्यता महाराष्ट्रातील नाशिकहून मोठ्या प्रमाणात लसणाची निर्यात होते. कोलकात्यातच नाही तर गुजरातमधील अहमदाबादमध्येही लसूण 400 ते 500 रुपयापर्यंत किलोनं विकला जात आहे. याशिवाय दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशमध्ये लसणाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
लसणाचे दर वाढण्याचं कारण काय?
खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेच प्रमुख कारण आहे. पिकाचं नुकसान झाल्यामुळं दुसऱ्या पिकाची लागवड करण्यास वेळ लागला. त्यामुळे नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब होत आहे. त्यामुळं भाव वाढत असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. मध्य प्रदेशात लसणाची सर्वाधिक लागवड केली जाते. मात्र, खराब हवामानामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळं नवीन पीक येण्यास विलंब होत आहे. दरम्यान, लसणाचे पीक बाजारात येताच, लसणाचे भाव उतरतील असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
भारतात सुमारे 32.7 लाख टन लसणाचे उत्पादन होते. भारतात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेशात होते. मात्र, चीनमध्ये उत्पादनात घट होऊनही ते जगात पहिल्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये दरवर्षी सुमारे 2 ते 25 दशलक्ष टन लसणाचे उत्पादन केले जाते, जरी दोन्ही देशांमध्ये बहुतेक लसणाचा वापर देशांतर्गत केला जातो.
कांद्यासह बटाट्याच्या दरात घसरण
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. जेव्हा कांद्याचे भाव गगनाला भिडले होते, तेव्हा सरकारने तात्काळ पावले उचलली होती. 7 डिसेंबर 2023 पासून लागू करण्यात आलेल्या निर्यातबंदीमुळं कांद्याच्या किंमती नियंत्रणात आणल्या. दोन महिन्यांत त्याची किंमत 75 टक्क्यांहून अधिक घसरली आहे.
बटाट्याच्या दरात 30 टक्क्यांनी घसरण
कांद्याबरोबरच स्वयंपाकघरातील आणखी एक महत्त्वाची भाजी असलेल्या बटाट्याच्या दरातही घट झाली आहे. एका महिन्यात बटाट्याच्या किंमतीत 30 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र, बटाटे आणि कांद्याचे भाव घसरले आहेत. मात्रस दुसरीकडे लसणाला दराचा तडका मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: