लसणाच्या दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांना फायदा तर सर्वसामान्यांना फटका
टोमॅटोनंतर सध्या लसणाच्या किंमतीत (Garlic Price) मोठी वाढ होताना दित आहे. लसणाने उत्तर प्रदेशातील (UP) किंमतीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
Garlic Price Rise : टोमॅटोनंतर सध्या लसणाच्या किंमतीत (Garlic Price) मोठी वाढ होताना दित आहे. लसणाने उत्तर प्रदेशातील (UP) किंमतीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. यावेळी लसणाचे भाव गगनाला भिडल्याने आता लोकांच्या ताटातून लसूण गायब झाला आहे. 150 ते 200 रुपये प्रतिकिलो दराने मिळणार लसूण सध्या मंडईत 400 रुपये प्रतिकिलो दरानं विकला जात आहे.
गेल्या वर्षी लसणाचे उत्पादन अधिक झाले होते. लसणाचा प्रदेश समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने गेल्या वेळी लसणाची 25 रुपये किलोने विक्री झाली होती. यावेळी शेतकऱ्यांनी लसणाची पेरणी कमी केल्याने कमी उत्पादनामुळे पुरवठा होत नसल्याने भाव वाढले आहेत. मागणी वाढली आहे. अशात त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळं लसणाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. याचा फायदा ज्या शेतकऱ्यांकडे लसूण आहे, त्यांना होत आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत असल्याचं चित्र दिसत आहे.
उत्पादन कमी झाल्याने भाव वाढले
गेल्या वेळी सलणाच्या भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळं यावेळी शेतकऱ्यांनी नफ्यासाठी कमी लसणाची पेरणी केली होती. त्यामुळं त्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळेच सध्या बाजारात उपलब्ध असलेला लसूण 150 ते 200 रुपये किलो दराने मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. दरम्यान, लसणाचे नवे पीक केव्हा येईल, त्याचे उत्पादन जास्त झाल्यास भाव कमी होण्याची अपेक्षा आहे. हीच माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे की, त्यांनी एखाद्या वस्तूच्या मागणीनुसार उत्पादन करावे, परंतू, कोणत्याही वस्तूचे जास्त उत्पादन झाल्यास त्याच्या साठवणुकीत अडचण येते आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचेही नुकसान होते.
भारतामध्ये लसणाच्या व्यापार होतेय सातत्याने वाढ
जगात लसणाच्या व्यापारात चीनची बरोबरी कोणताही देश करत नाही. पण भारत आता या आघाडीवरही चीनला मात देत आहे. भारताचा लसणाचा व्यापार सातत्याने वाढत आहे. ज्यामुळं चीनच्या अडचणी वाढत आहेत. दरम्यान, चीनने ब्लीच केलेला लसूणही टाकण्यास सुरुवात केली आहे.सध्या लसणाच्या निर्यातीत चीन अजूनही जगात आघाडीवर आहे यात शंका नाही. एकेकाळी चीनने जगातील 80 टक्के लसणाची निर्यात केली होती. जी आता अलिकडच्या वर्षांत 70 ते 75 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. दरम्यान, भारताच्या लसूण निर्यातीत वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: