अमेरिकेत 1 किलो बटाट्याची किंमत किती? किंमत एकूण व्हाल थक्क?
भारतात (India) 10 ते 40 रुपये किलो दरानं मिळणाऱ्या बटाट्याची अमेरिकेत किती किंमत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Potato Price : देशातील जवळपास सर्वच घरात भाजीसाठी बटाट्याचा (Potato) वापर केला जातो. देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणात भाजीसाठी तसेच विविध पदार्थ तयार करण्यासाठी बटाट्याचा वापर केला जातो. पश्चिम उत्तर प्रदेशातही बटाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दरम्यान, भारतात (India) 10 ते 40 रुपये किलो दरानं मिळणाऱ्या बटाट्याची अमेरिकेत किती किंमत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
अमेरिकेत एक किलो बटाट्याची किंमत 3.01 डॉलर्स
आपल्या देशात बटाट्याची किंमत ही त्याच्या प्रकारावर आणि आकारावर अवलंबून असते. त्यामुळं बाजारात वेगवेगळ्या दराचे बटाटे मिळतात. सर्वसाधारणपणे, प्रत्येक घरात आणि प्रत्येक खाद्यपदार्थाच्या दुकानात बटाटे वापरले जातात. बटाट्याची किंमत बहुतांशी 10 रुपये प्रति किलो ते 40 रुपये प्रतिकिलो आहे. पण अमेरिकेत बटाट्याचे भाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एका अहवालानुसार, सध्या अमेरिकेत एक किलो बटाट्याची किंमत 3.01 डॉलर्स म्हणजे सुमारे 250 रुपये प्रति किलो आहे. साधारणपणे आपल्याकडे वर्षभर बटाटा खाल्ला जातो. कारण त्याची किंमत कमी असते. सध्या किरकोळ बाजारात बटाट्याची किंमत ही 20 ते 25 रुपये प्रतिकिलो आहे. वर्षभर जास्तीत जास्त 30 ते 50 रुपये या दराने बटाटे विकले जातात. पण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बटाट्याची किंमत वाढली आहे.
बटाट्याचे अनेक प्रकार आहेत
आम्ही तुम्हाला सांगतो की बटाट्याचे अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये लाल, पांढरा, पिवळा आणि जांभळा यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रकारच्या बटाट्याच्या किंमत वेगळी आहे. एका अहवालानुसार, लाल बटाटे सर्वात स्वस्त आहेत, तर जांभळे बटाटे सर्वात महाग आहेत.
भारतातील देशी बटाट्यांना परदेशात मोठी मागणी
भारत (India) जगातील अनेक देशांना अन्नधान्यासह फळे भाजीपाला याची निर्यात करतो. सर्वच प्रकारच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. भारतातील देशी बटाट्यांना (Potato) परदेशात विशेष मागणी आहे. देशी बटाट्यांमुळं परदेशी लोकांमध्ये देशाची एक खास ओळख निर्माण झाली आहे. भारताच्या एकूण बटाटा उत्पादनात सहा राज्यांचा 90 टक्के वाटा आहे. भारतीय देशी बटाटे श्रीलंका, ओमान, इंडोनेशिया, मलेशिया, मॉरिशस अशा अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात.
देशातील 'ही' राज्ये बटाटा उत्पादनात आघाडीवर
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी बटाटा उत्पादनात सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या सहा राज्यात 90 टक्के उत्पादन होते. बटाटा उत्पादनात उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. या राज्यात 29.65 टक्के शेतकरी बटाट्याचे उत्पादन घेतात. पश्चिम बंगालमध्ये 23.51 टक्के, बिहारमध्ये 17.2 टक्के, गुजरातमध्ये 7.05 टक्के आणि मध्य प्रदेशात 6.68 टक्के आणि पंजाबमध्ये 5.32 टक्के शेतकरी बटाट्याचे उत्पादन होत आहे.
महत्वाच्या बातम्या: