एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PMSBY : वर्षाला फक्त 20 रुपयांत 2 लाखांचा विमा ! योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे आणि कशी नोंद कराल ?
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये केला आहे. या योजनेअंतर्गत सरकार 2 लाखांचा मृत्यू विमा देते. म्हणजेच, या अंतर्गत 2 लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे.
PMSBY : केंद्र सरकारने 1 जूनपासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) प्रीमियममध्ये वाढ केली आहे. आता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये केला आहे. या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला 2 लाखांचा मृत्यू विमा देते. म्हणजेच, या अंतर्गत 2 लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे, तर 1 लाख रुपये वेगवेगळ्या परिस्थितीत उपलब्ध आहेत.
जाणून घेऊया या योजनेची माहिती
- अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे
- तुम्ही ऑनलाईन किंवा बँकेला भेट देऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) चा फॉर्म भरू शकता.
- हा विमा तुम्ही कोणत्याही बँकेतून घेऊ शकता. सार्वजनिक क्षेत्रासोबतच खासगी बँकांनीही त्यांच्या वेबसाईटवर यासंबंधीची संपूर्ण माहिती दिली आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. बँक खात्यातून पैसे थेट डेबिट केले जातात.
- हा फॉर्म इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिया, मराठी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुमचे बचत खाते असलेल्या बँकेत जाऊन तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागेल.
- प्रीमियमसाठी, तुम्हाला बँक फॉर्ममध्ये मंजूरी द्यावी लागेल की तुमच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप कापली जाईल. बँका दरवर्षी 1 जून रोजी तुमच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप कापून घेतील.
- अर्जदाराचे वय 18 वर्षे असावे. त्याच वेळी, जास्तीत जास्त 70 वर्षांपर्यंतचा विमा दिला जाऊ शकतो.
- अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये दिले जातात.
- दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावणे किंवा एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय गमावणे यासारख्या अपघातामुळे झालेल्या कायमस्वरूपी अपंगत्वासाठी 2 लाख रुपये दिले जातील.
- एका डोळ्यातील दृष्टी कमी होणे, किंवा एक हात किंवा पाय गमावणे यासारख्या अपघातामुळे कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये दिले जातील.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement