Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घट; देशातील पेट्रोल-डिझेलचे दरावर परिणाम होणार?
Petrol-Diesel Price Today: देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...
![Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घट; देशातील पेट्रोल-डिझेलचे दरावर परिणाम होणार? Petrol Diesel Price Today 23 January 2023 know latest price in metro cities Inculding Maharashtra Marathi News Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घट; देशातील पेट्रोल-डिझेलचे दरावर परिणाम होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/28/4a1a2fa8c22e607c35de433be7e74f9d1669601407155345_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol-Diesel Price 23 January 2023: भारतातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या (Crude Oil) आधारावर दररोज पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले जातात. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. अशातच आज भारतीय तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. नव्या दरांनुसार, आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशातील सर्व महानगरांत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. काही शहरांत मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरांत काहीसे बदल झाल्याचं पाहायला मिळतंय.
तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नवीन दरांनुसार, 23 जानेवारी 2023 रोजी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. अशातच आज महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल त्यांच्या जुन्या दरांवरच आहे. आज, WTI कच्च्या तेलाच्या किमतीत (WTI Crude Oil Price) 0.33 टक्क्यांच्या घसरणीनंतर, ते प्रति बॅरल 81.37 डॉलरवर व्यापार करत आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड (Brent Crude) ऑइलबद्दल बोलायचे तर ते 0.38 टक्क्यांच्या घसरणीनंतर प्रति बॅरल 87.30 डॉलरवर व्यवहार करत आहे.
Petrol Diesel Price Today : देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेल जुन्याच दरानं उपलब्ध
भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरांत बऱ्याच दिवसांपासून कोणताही नवा बदल झालेला नाही. शेवटचा मोठा बदल मे महिन्यात झाला. देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारनं उत्पादन शुल्कात मोठी कपात केली होती. पेट्रोलच्या दरांत प्रतिलिटर आठ रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्याचवेळी डिझेलच्या दरांत प्रतिलिटर सहा रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही मोठा बदल झालेला नाही. देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच दरांवर कायम आहेत.
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)