एक्स्प्लोर

Petrol Rate Today : वर्ष संपायला उरलेत फक्त 10 दिवस, झटपट चेक करा तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : ब्रेंट क्रूड सुमारे 80 डॉलर आहे आणि WTI किंमती प्रति बॅरल 75-76 डॉलरच्या आसपास आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्षात देशात इंधनाच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे.

Petrol Diesel Price in 21 December 2022: देशातील कोट्यवधी जनता जवळपास 7 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त होण्याची वाट पाहत आहे. मात्र त्यांची प्रतीक्षा संपण्याचं नाव घेत नाहीये. आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्‍च्‍या तेलाची किंमत (Crude Oil Price in International Market) मार्चमध्ये गाठलेल्या उच्चांकाच्या तुलनेत 40 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. तरीही, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price Today) फक्त एकदाच बदल झाला आहे. केंद्र सरकारनं 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 

तज्ञांच्या मते, ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत (Brent Crude Oil Price) सुमारे 80 डॉलर आहे आणि डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलची किंमत (WTI Crude Oil Price) प्रति बॅरल सुमारे 75-76 डॉलर आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षात देशात इंधनाच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षाच्या 10 दिवस आधी तुम्हाला त्यांच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील ते जाणून घेऊयात.

कच्च्या तेलाचे दर 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत फारसा चढ-उतार झालेला नाही. 24 तासांपूर्वी जे दर होते तेच आज आहेत. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत 0.24 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 79.99 डॉलरवर व्यापार करत आहे. दुसरीकडे, अमेरिकन कच्च्या तेलाच्या WTI ची किंमत 1.20 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे आणि किंमत प्रति बॅरल 76.09 डॉलरवर व्यवहार करत आहे. भारतीय वायदा बाजाराबाबत बोलायचं झालं तर, 20 डिसेंबर रोजी व्यापार बंद झाल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 6,340 रुपये होती. 

आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच 

देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. 22 मे नंतर देशातील चारही महानगरांमध्ये इंधनाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 40 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. आजही मुंबईत पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या वरच आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर 96 रुपयांपेक्षा जास्त आहे.

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget