Petrol Diesel Hike | तेराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
देशात सलग तेराव्या दिवशी इंधन दरवाढ झाल्याचं दिसून येत आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात पेट्रोलचे दर 85.21 रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 75.53 रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसमुळे सध्या तेलांच्या किमती वाढताना दिसत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सलग तेराव्या दिवशी वाढ झाली आहे. शुक्रवारी 19 जून रोजी पेट्रोलचे दर 0.56 रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर 0.63 रुपयांनी वाढले आहेत.
देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 78.37 रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहेत. तर डीझेलची किंमत वाढून 77.06 रुपये प्रति लिटर एवढी झाली आहे. याचसोबत पेट्रोलच्या किमतीमध्ये 7.11 रुपये आणि डिझेलमध्ये 7.69 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढ झाली आहे. शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात पेट्रोलचे दर 85.21 रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 75.53 रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 81.22 रूपये प्रति लिटर आणि 74.77 रूपये एवढे झाले आहेत. तसेच कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे 80.13 रूपये प्रति लिटर आणि 72.53 रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर 80.91 रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 73.28 रूपये प्रति लिटरवर गेले आहेत.
जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहेत दर? (इंडियन ऑइल)
शहर | पेट्रोलचे दर | डिझेलचे दर |
दिल्ली | 78.37 | 77.06 |
मुंबई | 85.21 | 75.53 |
चेन्नई | 81.82 | 74.77 |
कोलकत्ता | 80.13 | 72.53 |
नोएडा | 79.50 | 69.86 |
लखनऊ | 79.40 | 69.78 |
पाटणा | 81.73 | 74.74 |
लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर सलग तेराव्या दिवशी वाढ
आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्यानंतरही भारतीय लोकांच्या खिशाला आराम मिळालेला नाही. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर मागे घेण्याची मागणी केली आहे. परंतु, शुक्रवारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी सलग तेराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे.
दरम्यान, राज्यांमध्ये सेल्स टॅक्स आणि व्हॅट लावण्यात आल्यामुळे इंधनाच्या दरांवर परिणाम होतो. तेल कंपन्या सध्या इंधन दरात दररोज दरवाढ करत आहेत. याआधी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देशात इंधनांचे दर सलग 82 दिवसांपर्यंत स्थिर होते. कंपन्यांनी दररोज इंधन दरवाढ करण्याचा नियम काही दिवसांसाठी स्थगित केला होता. परंतु, लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर तेलाच्या किमतींमध्ये सतत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
नवउद्योजकांसाठी 'विको'चे संजीव पेंढारकरांचा उपक्रम, ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन
झोमॅटो 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; तर सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपातअमेरिकी कंपनी ‘सिल्वर लेक’ची जिओमध्ये 5,656 कोटींची गुंतवणूक
Facebook | रिलायन्स जिओमधील 9.99 टक्के भागभांडवल फेसबुक विकत घेणार