एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; मुंबई, पुण्याचा पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम होणार?

Petrol-Diesel Price Today: आज देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांती एक लिटर पेट्रोलच्या किमती...

Petrol-Diesel Rates: देशात आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. नव्या दरांनुसार, देशातील महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत किरकोळ बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे संकेत दिले जात आहेत. सरकारनं निर्णय घेतल्यास महागाईनं भरडलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 75 डॉलरच्या जवळ पोहोचला आहे. WTI कच्च्या तेलाची किंमत 0.90 टक्क्यांनी घसरून 69.80 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. याशिवाय ब्रेंट क्रूड ऑईल 0.89 टक्क्यांनी वाढून 74.68 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. जे लवकरच प्रति बॅरल 75 डॉलर्स होऊ शकतं. 

मे 2022 पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Prices) कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर 

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33  रुपये प्रति लिटर

देशात मे 2022 नंतर किंमतींमध्ये कोणताही बदल नाही

शेवटच्या वेळी पेट्रोल-डिझेलचे दर मे 2022 मध्ये बदलले होते. त्यानंतर पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये उत्पादन शुल्क कमी करण्यात आलं. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 9.5 आणि 7 रुपयांनी कमी झाले आहेत. जुलै 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 5 आणि 3 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील दर आणखी घटले होते. 

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Embed widget