एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतींत विक्रमी घसरण; देशातील इंधन दरांची स्थिती काय?

Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतींत (Crude Oil) मोठी घसरण झाली असून ते प्रति बॅरल 75 डॉलरवर पोहोचले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, ब्रेंट क्रूडची किंमत 72.97 डॉलर इतकी आहे आणि WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 66.74 डॉलर आहे. मात्र, यापूर्वी कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उताराचा प्रभाव भारतात दिसलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and Diesel Price) स्थिर आहेत. 

तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमती अपडेट केल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरातील दिलासा आजही कायम आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतेही बदल केलेले नाहीत. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

आज देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील महानगरं पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये
चेन्नई  102.63 रुपये 94.24 रुपये

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget