एक्स्प्लोर

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाचे दर गडगडले; देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींची स्थिती काय?

Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील किमती काय?

Petrol and Diesel Price Today : भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and Diesel Price) दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्या जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या (Crude Oil Price) आधारे या किमती निश्चित केल्या जातात. 18 फेब्रुवारी 2023 बद्दल बोलायचं झालं तर आज कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी घसरण नोंदवली जात आहे. WTI कच्च्या तेलाची किंमत (WTI Crude Oil Price) 2.74 टक्क्यांनी घसरुन प्रति बॅरल 76.34 डॉलरवर व्यापार करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) देखील 2.51 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल 83.00 डॉलरवर व्यापार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल झाला आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती काय? 

देशातील महानगरांत आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाच्या राजधानीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचं झालं तर, येथे पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लीटर आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे.

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Vs BJP : राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणारSanjay Pandey Join BJP : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणारBus Boook Modi Event : मोदींच्या कार्यक्रमासाठी तीन दिवस एसटीच्या 760 बस बुकिंगSidco Home Lottery : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिडकोच्या घरांचा धमाका, 40 हजार गरांची लॉटरी निघणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Embed widget