PM Suryodaya Yojana : पंतप्रधान सूर्योदय योजना काय आहे? एक कोटीहून अधिक घरे उजळणार
Pradhan Mantri Suryodaya Yojana : पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे. काय आहे पंतप्रधान सूर्योदय योजना हे सविस्तर जाणून घ्या.
PM Suryodaya Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना आणखी एक भेट दिली आहे. अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापनेच्या (Pran Pratishtha) दिवशी पंतप्रधान मोदी यांनी नवीन योजनेची घोषणा केली. अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर दिल्लीत परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची सोलार योजना जाहीर केली आहे. सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दिल्लीत परतताच पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत देशातील घरांच्या छतावर सोलार पॅनेल बसवण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या घोषणेची घोषणा करताना सांगितलं की, या योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक घरांच्या छतावर सोलर सिस्टीम बसवण्यात येईल.
पंतप्रधान मोदींकडून योजनेची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर म्हणजेच एक्स मीडिया हँडलवरून पोस्ट करताना लिहिलं की, ''आज, अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझ्या संकल्पाला आणखी बळ मिळाले की, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी. जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमी ऊर्जा मिळते. आज, अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझ्या संकल्पाला आणखी बळ मिळालं की, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी.''
सूर्यवंशी भगवान श्री राम के आलोक से विश्व के सभी भक्तगण सदैव ऊर्जा प्राप्त करते हैं।
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024
आज अयोध्या में प्राण-प्रतिष्ठा के शुभ अवसर पर मेरा ये संकल्प और प्रशस्त हुआ कि भारतवासियों के घर की छत पर उनका अपना सोलर रूफ टॉप सिस्टम हो।
अयोध्या से लौटने के बाद मैंने पहला निर्णय लिया है कि… pic.twitter.com/GAzFYP1bjV
पंतप्रधान सूर्योदय योजना काय आहे?
पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी घरांवर सोलर सिस्टीम बसवण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश घराघरात स्वस्तात वीज पोहोचवणे आहे. या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच देशात अद्यापही असे भाग आहेत, जिथे घरांमध्ये वीज पोहोचलेली नाही. केंद्र सरकार आता पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत कळाकुट्ट अंधार असणाऱ्या घरात आशेचा किरण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत कोट्यवधी घरे उजळणार आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योद्य योजनेची घोषणा करताना सांगितलं की, ''अयोध्येतून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला आहे की, आमचे सरकार 1 कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल.''
महत्त्वाच्या इतर बातम्या :