(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : अयोध्येवरून परताच पीएम मोदींची मोठी घोषणा; एक कोटी नागरिकांसाठी सुरू होणार 'ही' योजना
Pradhanmantri Suryodaya Yojana : अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दिल्लीत परताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.
PM Modi : अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दिल्लीत परताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे. देशातील नागरिकांच्या घरावर त्यांच्या मालकीचे सोलर सिस्टीम असावी यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. पीएम मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवर या योजनेची माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी काय म्हटले?
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे. देशातील नागरिकांच्या घरावर त्यांची स्वत:ची सोलर यंत्रणा असावी.
सूर्यवंशी भगवान श्री राम के आलोक से विश्व के सभी भक्तगण सदैव ऊर्जा प्राप्त करते हैं।
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024
आज अयोध्या में प्राण-प्रतिष्ठा के शुभ अवसर पर मेरा ये संकल्प और प्रशस्त हुआ कि भारतवासियों के घर की छत पर उनका अपना सोलर रूफ टॉप सिस्टम हो।
अयोध्या से लौटने के बाद मैंने पहला निर्णय लिया है कि… pic.twitter.com/GAzFYP1bjV
पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटले की, अयोध्येहून परतल्यानंतर, मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसविण्याचे लक्ष्य घेऊन "प्रधानमंत्री सूर्योदय योजना" सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल,असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.