search
×

महिलांसाठी सरकारची खास योजना; पोस्टाच्या 'या' योजनेतून मिळवा बक्कळ व्याज

Mahila Samman Saving Certificate: महिला आता पोस्ट ऑफिसमधून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate- MSSC) खरेदी करू शकणार आहेत. वित्त मंत्रालयानं, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे.

FOLLOW US: 
Share:

Post Office New Small Savings Schemes: देशभरातील पोस्ट ऑफिसमध्ये (Indian Post Office) नवी बचत योजना सुरू करण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशानं सरकारनं 1 एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू केली आहे. महिला आता पोस्ट ऑफिसमधून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate- MSSC) खरेदी करू शकणार आहेत. वित्त मंत्रालयानं, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. तसेच, ही अधिसूचना जारी करताना वित्त मंत्रालयानं महिला सन्मान बचत प्रमाणपत्र देशभरातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये त्वरित उपलब्ध करून देण्यात आल्याचंही सांगितलं आहे. 

7.5 टक्के व्याज मिळणार 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात (Budget 2023-24) केली होती. अर्थमंत्र्यांनी 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'च्या निमित्तानं ही घोषणा केली होती. तसेच, ही योजना म्हणजे, मुलींसह महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारच्या वतीनं महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुरू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये 2 वर्षांच्या कालावधीसह फ्लेक्सिबल गुंतवणूक आणि अंशतः पैसे काढण्याचे पर्याय आहेत. यामध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के चक्रवाढ व्याज तिमाही दरानं मिळणार आहे. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध असणार आहे.

म्हणजेच, जर तुम्ही मार्च 2023 मध्ये, महिला बचत प्रमाणपत्रात गुंतवणूक केली. तर, तुम्ही या योजनेतून मार्च 2025 पर्यंत पैसे काढू शकता. या दोन वर्षांमध्ये तुम्ही अंशतः पैसे काढू शकता. 

MIS मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढली

मासिक उत्पन्न खातं (MIS) योजना 2019 मध्ये राष्ट्रीय बचत योजना, 2023 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे. तसेच, एकल खातं आणि संयुक्त खात्यासाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार्‍या 9 लाख रुपये ते 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा 15 लाखांवरून 30 लाख रुपये करण्यात आली आहे.

छोट्या बचतीवर, अधिक व्याज 

PPF वगळता सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून वाढवून सुधारित करण्यात आला आहे. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत ग्राहकांना या उपायांचा अधिक फायदा होईल. यासोबतच या योजनांमध्ये पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागातील मुली, महिला, शेतकरी, कारागीर, ज्येष्ठ नागरिक, कारखानदार, सरकारी कर्मचारी, छोटे व्यापारी आणि समाजातील इतर घटकांना अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केलं जाईल. तसेच, त्यांना छोट्या बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.

Published at : 03 Apr 2023 02:16 PM (IST) Tags: income tax post office tax Post Office Investment Investment Tax Saving Tips

आणखी महत्वाच्या बातम्या

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

टॉप न्यूज़

Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा

IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक