Mutual Funds : फक्त 500 रुपयांपासून सुरुवात, 'एवढ्या' वर्षात जमा होतील 21 लाख रुपये; असं करा गुंतवणुकीचं नियोजन
SIP Investment Plan : जर तुम्ही SIP द्वारे पैसे गुंतवले तर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी चांगली रक्कम जमा करू शकता. चांगली बाब म्हणजे, तुम्ही एसआयपीमध्ये 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
Mutual Funds Power of SIP : सध्या एसआयपी (SIP) हा गुंतवणुकीचा पर्याय (Investment Plan) ट्रेंडमध्ये आहे. बहुतेक लोक एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यास प्राधान्य देताना दिसतात. तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात दीर्घकाळ पैसे गुंतवल्यास, तुमच्या भविष्यासाठी चांगली रक्कम जमा करु शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एसआयपीमध्ये 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. म्युच्युअल फंड हे चक्रवाढीचे उत्तम उदाहरण आहे. आजकाल लोक SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत. म्युच्युअल फंड हे शेअर बाजाराशी निगडित आहेत, त्यामुळे त्यातील गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची खात्री देता येत नाही, पण बहुतेक तज्ज्ञांच्या मते, की म्युच्युअल फंडातून सरासरी 12 टक्के परतावा मिळतो, तर कधी कधी परतावा यापेक्षाही जास्त असतो. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही हमी योजनेत तुम्हाला इतका परतावा मिळणार नाही, त्यामुळे SIP ला लोक जास्त प्राधान्य देत आहेत.
SIP मध्ये 500 रुपयांपासून गुंतवणूक
जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये दीर्घ काळासाठी एसआयपीद्वारे पैसे गुंतवले तर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी चांगली रक्कम जमा करू शकता. चांगली बाब म्हणजे, तुम्ही एसआयपीमध्ये 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि तुमचे उत्पन्न जसजसे वाढत जाईल तसतसे तुम्ही गुंतवणुकीत वेळोवेळी थोडी-थोडी वाढ करू शकता. तुम्ही किती मोठ्या रकमेने SIP सुरू करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही ते किती काळ गुंतवणूक सुरळीत कायम ठेवता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही 500 रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकता आणि लाखो रुपये जमा करु शकता.
गुंतवणुकीचं नियोजन कसं करावं? जाणून घ्या
तुम्ही एसआयपीमध्ये फक्त 500 रुपयांची गुंतवणूक सुरू केल्यास, तुम्ही ही गुंतवणूक किमान 25 ते 30 वर्षे सुरू ठेवू शकता. तसेच, तुम्हाला या गुंतवणुकीत दरवर्षी किमान 10 टक्क्यांनी वाढ करावी लागेल. त्याचप्रमाणे, तुम्हाला दरवर्षी 10 टक्के रक्कम जोडून तुमची गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल. अशा प्रकारे, 25 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक 5,90,082 रुपये होईल.
25 वर्षांत 21 लाखांहून अधिक रक्कम जमा
उदाहरणार्थ, जर तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर पुढच्या वर्षी तुम्हाला 500 रुपयांच्या 10 टक्के म्हणजेच 50 रुपये, म्हणजेच 550 रुपये गुंतवावे लागतील. पुढील वर्षी 550 रुपयांच्या 10 टक्के म्हणजेच 55 रुपये त्यात जोडावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्हाला त्या वर्षात 605 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही 12 टक्के परतावा मोजला तर तुम्हाला फक्त व्याजातून 15,47,691 रुपये मिळतील. अशा प्रकारे, 21 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 21,37,773 रुपये मिळतील.
30 वर्षांत 44,17,062 रुपयांचा निधी जमा
जर तुम्ही आणखी 5 वर्षे म्हणजे सुमारे 30 वर्षे गुंतवणूक चालू ठेवली तर तुमची एकूण गुंतवणूक 9,86,964 रुपये होईल, पण12 टक्के दराने त्यावर 34,30,098 रुपये व्याज मिळेल आणि 30 वर्षानंतर तुम्हाला एकूण 44,17,062 रुपये परतावा मिळेल.
(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :