search
×

TATA Group Stock: टाटाचा मल्टिबॅगर शेअर; एक लाखाच्या गुंतवणुकीचे केले 13 कोटी, जाणून घ्या कसे

TATA Group Stock: टाटा समूहातील या कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला आहे.

FOLLOW US: 
Share:

TATA Group Stock: टाटा समूहातील कंपनीच्या शेअरमध्ये सध्या चांगली तेजी दिसून येत आहे. मागील काही वर्षात शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या टाटा समूहातील कंपन्यांनी (Tata Group Listed Companies) चांगला परतावा दिला आहे. टाटा समूहातील 'टाटा एलेक्सी' (Tata Elxsi) या कंपनीच्या शेअर दरात मागील सुमारे अडीच वर्षात मोठी वाढ झाली आहे. एप्रिल 2020 मध्ये Tata Elxsi च्या शेअरची किंमत 640 रुपये होती. आता प्रति शेअर दर 8840 रुपये इतका झाला आहे. जवळपास अडीच वर्षाच्या कालावधीत या स्टॉकने आपल्या शेअरधारकांना जवळपास 1300 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 

या आयटी स्टॉकने दीर्घकालीन मुदतीत शेअरधारकांना जबरदस्त परतावा दिला आहे. सप्टेंबर 1995 मध्ये Tata Elxsi चा शेअर दर हा 13.50 रुपये इतका होता. सध्या याचा दर 8840 रुपये आहे. याचाच अर्थ मागील 27 वर्षात Tata Elxsi च्या शेअरने 65,380 टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. यामध्ये बोनस शेअरचाही सहभाग आहे. या मल्टिबॅगर आयटी शेअरने सप्टेंबर 2017 मध्ये 1:1 या प्रमाणात बोनस शेअर दिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. 

मागील एक महिन्यात टाटा समूहाच्या या मल्टिबॅगर स्टॉकच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. मागील जवळपास एक महिन्यात या शेअरच्या दरात जवळपास 10 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्यामुळे 9,860 रुपयांवर ट्रेड करणारा हा शेअर 8,840 रुपयांच्या पातळीवर घसरला आहे. मागील सहा महिन्यात Tata Elxsi च्या शेअर दराची किंमत 7600 रुपयांहून 8840 रुपये प्रति शेअर इतकी झाली. या दरम्यान, 16 टक्क्यांची तेजी दिसून आली होती. 

एका वर्षात 50 टक्क्यांचा परतावा

मागील एक वर्षात Tata Elxsi च्या शेअरची किंमत जवळपास 5850 रुपयांहून 8840 रुपयांच्या पातळीपर्यंत झाली. त्यामुळे शेअरधारकांना जवळपास 50 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. मागील पाच वर्षाच्या कालावधीत Tata Elxsiचा शेअर जवळपास 815 रुपयांहून 8840 रुपयांच्या स्तरावर पोहचला आहे. जवळपास 1000 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. 

गुंतवणुकीचा फंडा समजून घ्या

Tata Elxsi च्या शेअर दराच्या इतिहासानुसार, एखाद्या गुंतवणूकदाराने 27 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती आणि आतापर्यंत शेअर होल्ड करून ठेवले असते तर एक लाखाची गुंतवणूक करणारा करोडपती झाला असता. 27 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 13.50 रुपये या दराने एक लाखाची गुंतवणूक केली असती तर, त्याला 7407 शेअर्स मिळाले असते. कंपनीने सप्टेंबर 2017 मध्ये 1:1 या प्रमाणात शेअर दिले होते. म्हणजे एकूण शेअर हे 14,814 इतके झाले असते. अशातच या शेअरची किंमत 13.09 कोटी रुपये झाली असती. 

(Disclaimer: ही बातमी फक्त माहितीसाठी आहे. शेअर खरेदी अथवा विक्रीसाठीची शिफारस नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमीची असते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. शेअर बाजारातील तुमचा फायदा अथवा नुकसानीसाठी एबीपी माझा जबाबदार नाही)

Published at : 25 Sep 2022 02:33 PM (IST) Tags: sensex tata nifty Multibagger Stock Stock Market Share market Tata Elxsi

आणखी महत्वाच्या बातम्या

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

टॉप न्यूज़

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर

और एक फायनल...एक कप की ओर