search
×

Pension Schemes : निवृत्तीसाठीचे नियोजन करताय? 'या' चार सरकारी पेन्शन योजना आहेत फायदेशीर...

Pension Scheme After Retirement : निवृत्तीनंतरदेखील तुम्हाला दरमहा उत्पन्न हवे असल्यास या सरकारी पेन्शन योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता.

FOLLOW US: 
Share:

Pension Plans:  निवृत्तीनंतर, आयुष्याच्या उतारवयात उत्पन्न मिळावे यासाठी काही गुंतवणूक करतात. बाजारात विविध गुंतवणूक करण्यासाठी काही योजना आहेत. काही योजना अशा आहेत, ज्यातील गुंतवणूक कराल तर तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळू शकते. त्याशिवाय, कर सवलत आणि इतर फायदेदेखील मिळू शकतात. 

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme)

60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 55 ते 60 वयोगटातील लोकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. यामध्ये आयकर कलम 80C अंतर्गत कर लाभ दिला जातो. हे लघु बचत योजनेअंतर्गत चालवले जाते.

राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme)

या योजनेत तुम्ही नियमित गुंतवणूक करू शकता. सेवानिवृत्तीनंतर, कर्मचारी या योजनेतून काही पैसे काढू शकतो आणि उर्वरित पैसे कॉर्पसमध्ये गुंतवू शकतो. त्यानंतर तुम्हाला मासिक पेन्शन मिळते. ही मार्केट लिंक्ड योजना आहे. या योजनेत तुम्हाला आठ ते ते 10 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळतो. पाच वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्ही त्यातून पैसेही काढू शकता.

प्रधानमंत्री वय वंदना योजना (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana)

या योजनेअंतर्गत पेन्शनसोबतच विम्याचाही लाभ मिळतो. ज्येष्ठ नागरिक LIC अंतर्गत, ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2023  आहे. यामध्ये 10 वर्षांसाठी 7.4 टक्के वार्षिक व्याज दिले जाते.

अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme)

ही पेन्शन योजना करदात्यांसाठी नाही. या योजनेत 25 ते 40 या वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकता. या योजनेत सरकार पाच वर्षांसाठीचे आपले योगदान जमा करते. वयाच्या 60 व्या वर्षानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेनुसार, तुम्हाला दरमहा एक हजार, दोन हजार, तीन हजार आणि 5000 रुपयांची पेन्शन मिळू शकते. 

दरम्यान, सध्या भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) कार्यालयात पेन्शनसाठी निवृत्तीधारकांची मोठी गर्दी उसळली आहे. 1 सप्टेंबर 2014 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्चपर्यंत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीधारकांची पेन्शन कार्यालयात गर्दी दिसून येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Published at : 26 Feb 2023 09:21 PM (IST) Tags: retirement pension Investment tips Investment National Pension Scheme

आणखी महत्वाच्या बातम्या

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

टॉप न्यूज़

Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात

Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?

शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार

अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार