search
×

Financial Changes From Today 1 August : आजपासून होणार 'हे' 7 मोठे बदल, सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? जाणून घ्या...

Financial Changes From Today 1 August : आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून आजपासून अनेक बदल होणार आहे. हे बदल कोणते ते जाणून घ्या.

FOLLOW US: 
Share:

Rules Changing From 1 August 2022 : आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून आजपासून अनेक बदल होणार आहे. यामुळे सर्वासामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल ते येथे जाणून घ्या. या मोठ्या बदलांमध्ये आयकर परतावा, गॅस सिलेंडर सह बँकेसंदर्भातीलही काही नियम बदलणार आहेत.

1. आजपासून मतदार ओळखपत्र आणि आधार लिंकिंग मोहीम सुरू

आज म्हणजेच 1 ऑगस्ट 2022 पासून आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याची विशेष मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेद्वारे निवडणूक आयोग देशभरातील मतदार यादी आधारशी लिंक करण्याची तयारी करत आहे. या विशेष मोहिमेची सुरुवात महाराष्ट्र आणि झारखंडसारख्या राज्यांमधून होणार आहे.

2. एलपीजीच्या दरात कपात

व्यावसायिक LPG सिलिंडरच्या (19 किलो) किमतीआज कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. यानंतर मुंबई आणि दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी कमी झाली आहे. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये सिंलेंडर 36.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

3.आता दंडासह आयकर परतावा भरावा लागणार

आयकर परतावा (IT Return) भरण्यासाठी 31 जुलै रोजी शेवटची मुदत होती. ज्यांनी 31 जुलै रोजी आयकर परतावा भरला नाही, ते अद्यापही आयटीआर दाखल करु शकतात. पण यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. आयकर परतावा भरण्यासाठी तुम्हाला 5000 हजार दंड आकारला जाईल. सरकारने आयटी रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख दिली होती. आयटी रिटर्नसाठी सरकारने अद्याप तारीख वाढवलेली नाही, त्यामुळे आयकर परतावा न भरलेल्यांना दंडासह आयटी रिटर्न भरावा लागेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना विलंब शुल्क म्हणून 1000 रुपये भरावे लागतील. वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असल्यास 5000 रुपये दंड भरावा लागेल.

4. पंतप्रधान किसान सन्मान निधीचे EKYC

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या EKYC साठी 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. ज्यांनी  असे 31 जुलैपर्यंत EKYC केला नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या बाराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

5. इंडिया पोस्ट पेमेंट बँक घरपोच बँकिंग सुविधांसाठी शुल्क आकारणार

1 ऑगस्ट 2022 पासून म्हणजेच आजपासून पोस्ट विभागाची इंडिया पोस्ट पेमेंट बँक घरपोच बँकिंग सुविधांसाठी शुल्क आकारेल. IPPB विविध प्रकारच्या सेवांसाठी प्रति सेवा 20 रुपये जीएसटी​आकारेल.

6. बँक ऑफ बडोदाची पॉजिटिव पे सिस्टम लागू
आजपासून बँक ऑफ बडोदामध्ये पॉजिटिव पे सिस्टम लागू करण्यात आली आहे. आता ग्राहकांना चेक पेमेंट करताना या सिस्टमचा वापर करावा लागेल. यामध्ये ग्राहकांना पाच लाख रुपयांहून अधिक रकमेचं चेक पेमेंट करताना डिजिटल माहिती भरावी लागेल. चेकमध्ये तुम्हाला SMS, एटीएम, इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंगद्वारे चेक मेमेंट केलेल्या व्यक्तीचं नाव, अकाऊंट नंबर, रक्कम, चेंक नंबरही माहिती भरावी लागेल. यानंतर या सर्व माहिती क्रॉस पुन्हा तपासली केली जाईल आणि त्यानंतरच चेक क्लिअर होईल. 

7. HDFC कर्जाच्या दरात आजपासून वाढ 

एचडीएफसी बँकेने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे आणि नवीन दर आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. याचा परिणाम नवीन आणि जुन्या ग्राहकांवर होणार आहे. HDFC ने गृहकर्जावरील किरकोळ मुख्य कर्जदरात वाढ केली आहे. 

Published at : 01 Aug 2022 10:52 AM (IST) Tags: income tax tax bank lpg ITR August Rules Change

आणखी महत्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

टॉप न्यूज़

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले

Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती