EPF Account: नोकरी बदलली? EPF खात्यात एक्झिट डेट करा अपडेट; जाणून घ्या प्रक्रिया...
EPF Account: जर, तुम्ही आताच नोकरी बदलली असेल तर तुम्ही ईपीएफ खाते अपडेट करा...
EPF Account: प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या पगाराचा एक छोटासा भाग पीएफ (PF) खात्यात जमा केला जातो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत जमा केलेला निधी खातेदार आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकतात. आणि उर्वरित निधी निवृत्तीनंतर काढता येतो. ईपीएफ फंड हा वृद्धापकाळासाठी मोठा आधार आहे, अशा परिस्थितीत या खात्यातील सर्व माहिती अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. सहसा खाजगी क्षेत्रात लोक वेळोवेळी नोकऱ्या बदलत राहतात. अशा परिस्थितीत, ईपीएफ खात्यातील सर्व माहिती अपडेट करणे खूप महत्वाचे आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून (EPFO) खातेधारकांना डेट ऑफ एक्झिट (Date Of Exit) करण्याची तारीख तपासण्यासाठी ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे. तुम्हीही अलीकडेच नोकऱ्या बदलल्या असतील आणि तुमच्या EPF खात्यात नोकरी बदलण्याची तारीख अपडेट करायची असेल, तर ही सोपी प्रोसेस जाणून घ्या...
पीएफ खाते हस्तांतरित करावे लागेल
भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) नियमांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तर त्याला त्याचे पीएफ खाते हस्तांतरित करणे आवश्यक आहे. पीएफ खाते हस्तांतरित करण्यापूर्वी, त्या व्यक्तीने त्या कंपनीत कर्मचारी म्हणून स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही तुमचे ईपीएफ खाते दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकाल. कंपनी बदलल्यानंतर, तुमची बाहेर पडण्याची तारीख दोन महिन्यांत अपडेट करणे आवश्यक आहे.
ईपीएफओने ट्विट करून माहिती दिली
याबाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करताना EPFO ने ट्विट केले आहे की, आता कर्मचारी स्वतःहून बाहेर पडण्याची तारीख अपडेट करू शकतात. त्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या.
#Employees can now update their Date of Exit on their own. To know more about this process, watch this video. Follow these simple steps to update your #DateofExit.https://t.co/Ys5JgPiQEz#AmritMahotsav #epfowithyou #PF #पीएफ #epf #HumHaiNa@PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli
— EPFO (@socialepfo) July 12, 2023
डेट ऑफ एक्झिट अपडेट्स कसे कराल?
1. यासाठी, सर्वप्रथम कर्मचाऱ्याने https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ला भेट द्यावी.
2. यानंतर, UAN आणि पासवर्ड टाकून वेबसाइटवर लॉग इन करा.
3. यानंतर, मॅनेज टॅबवर क्लिक करा आणि मार्क एक्झिट हा पर्याय निवडा.
4. त्यानंतर खालील बाजूस तुम्हाला पीएफ खाते क्रमांक हा निवडावा लागेल.
5. त्यानंतर तुम्हाला तुमची कंपनी सोडण्यासाठी बाहेर पडण्याची तारीख निवडावी लागेल.
6. यानंतर OTP मिळवण्यासाठी Send OTP वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर देखील टाका.
7. यानंतर तुम्हाला चेक बॉक्सवर क्लिक करून अपडेट पर्याय निवडावा लागेल.