Paisa Zala Motha : टॅक्स रिटर्नचे बारकावे कोणते? जाणून घ्या कर सल्लागार काय सांगतात?
Paisa Zala Motha : टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अजून दीड महिना शिल्लक आहे. त्यामुळे टॅक्स रिटर्न भरताना त्यातील बारकावे समजून घेण्यासाठी एबीपी माझावर 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Paisa Zala Motha : "पेन्शन ही पगाराचा एक भाग आहे. ही पेन्शन कोणाकडून मिळते हे कर भरत असताना विवरण पत्रात दाखवावे लागले. त्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा खासगी कंपन्यांचा उल्लेख महत्वाचा असतो. टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अजून दीड महिना शिल्लक आहे. परंतु, त्याआधी वार्षीक माहिती पत्र आणि टॅक्स क्रेडीट पाहून रिटर्न भरणे गरजेचे आहे, अशी माहिती कर सल्लागार संजीव गोखले यांनी दिली. ते एबीपी माझाच्या (Abp Majha) 'पैसा झाला मोठा' (Paisa Zala Motha :) या कार्यक्रमात बोलत होते.
टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अजून दीड महिना शिल्लक आहे. त्यामुळे टॅक्स रिटर्न भरताना त्यातील बारकावे समजून घेण्यासाठी एबीपी माझावर 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संजीव गोखले यांनी अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.
"ज्यांचे उत्पन्न 1 एप्रिल 2021 नंतर अडीच लाखांच्या पुढे आहे त्यांनी विवरण पत्र भरत असताना त्यामध्ये उल्लेख करावा लागणार आहे. याबरोबरच निवासी किंवा अनिवासी करदात्यांनी योग्य पर्याय निवडावा आणि आपली निवासी स्थिती विवरण पत्रात नमूद करावी. शिवाय तुम्ही निवासी आहे की अनिवासी हे सिद्ध करावे लागणार आहे. याबरोबरच निवासी करदात्यांना परदेशातील मालमत्ता, संबंधित उत्पन्न दाखवणं गरजेचं असतं. याबरोबरच 2021 या कॅलेंडर वर्षातील परदेशातील उत्पन्न दाखवणे गरजेचे आहे. तर देशातील उत्पन्न हे आपल्या आर्थिक वर्षाप्रमाणे दाखलवावे लागेल, अशी माहिती संजीव गोखले यांनी दिली.
संजीव गोखले म्हणाले, "फक्त गुंतवणूक असेल तर ती रिटर्नमध्ये दाखवणे आवश्य नाही. परंतु, कर बचत गुंतवणूक असेल किंवा एक घर विकून दुसरे घर खरेदी केले असेल विवरण पत्रातातील कॉलम भरावे लागतील. ज्या गुंतवणुकीवर टॅक्स वाचत नाही अशा गुंतवणुकी विवरण पत्रात दाखवण्याची गरज नाही. याशिवाय आरडी, किंवा एफडी देखील विवरण पत्रात दाखवण्याची आवश्यकता नाही. परंतु, त्यावरील व्याज विवरण पत्रात दाखवावे लागेल. त्या वर्षात बॅंकेने किती व्याज दिले याचा उल्लेख करावा लागतो. याबरोबरच जमिनीवर अथवा फ्लॅटमध्ये मूलभूत बदल वा नूतनीकरणावेळी त्याच्या तारखा, खर्च झालेली किंमत विवरण पत्रात दाखवणं गरजेचं आहे."