एक्स्प्लोर

Ambareesh Murty Death : Pepperfry चे CEO अंबरीश मूर्ती यांचं निधन, 2012 मध्ये ऑनलाईन फर्निचर कंपनीची स्थापना

Pepperfry Ambareesh Murty Death : फर्निचर कंपनीची पेपरफ्राय (Pepperfry) चे फाऊंडर आणि सीईओ अंबरीश मूर्ती यांचं निधन झालं आहे.

Pepperfry Co-founder CEO : प्रसिद्ध ऑनलाईन फर्निचर कंपनीची पेपरफ्राय (Pepperfry) चे फाऊंडर आणि सीईओ अंबरीश मूर्ती (Ambareesh Murty) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 51 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लेहमध्ये असताना अंबरीश मूर्ती यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अंबरीश मूर्ती यांनी आशिष शाह यांच्यासोबत मिळून 2012 साली 'पेपरफ्राय' (Pepperfry) या ऑनलाईन फर्निचर कंपनीची (furniture and Home Decor) स्थापना केली होती. अंबरीश मूर्ती IIM (Indian Institutes of Management) चे विद्यार्थी होते.

पेपरफ्रायचे सीईओ अंबरीश मूर्ती यांचं निधन

पेपरफ्राय (Pepperfry) ऑनलाइन फर्निचर स्टोअरचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अंबरीश मूर्ती यांचं निधन झालं आहे. पेपरफ्रायचे दुसरे सह-संस्थापक आशिष शाह यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. आशिष शाह यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की, माझे मित्र, मेन्टॉर आणि भाऊ अंबरीश मूर्ती यांचं निधन झालं आहे. काल रात्री अंबरीश लडाखमध्ये होता, जिथे त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.'

1196 मध्ये IIM मधून MBA शिक्षण

अंबरीश मूर्ती यांनी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनीअरिंग केलं. यानंतर त्यांनी 1996 मध्ये आयआयएम (IIM) कोलकाता येथून एमबीए (MBA) पूर्ण केले. त्यानंतर ते कॅडबरी कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले. कंपनीने त्यांना एरिया सेल्स मॅनेजर म्हणून केरळला पाठवले. 2001 मध्ये सुमारे 5 वर्षांनी त्यांनी कॅडबरी कंपनी सोडली.

पहिल्या प्रयत्नात अपयश

त्यानंतर अंबरीश मूर्ती 2 वर्षांसाठी ICICI प्रुडेन्शियल AMC मध्ये म्युच्युअल फंड प्रोडक्ट लाँच करायला शिकले. 2003 मध्ये, त्यांनी आर्थिक प्रशिक्षण उपक्रम, ओरिजिन रिसोर्स सुरू करण्यासाठी नोकरी सोडली. पण त्यात त्यांना फारसं यश मिळालं नाही आणि 2005 मध्ये ब्रिटानियामध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून कॉर्पोरेट जगतात परतलं.

स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय

7 महिन्यांतच ते eBay India मध्ये रुजू झाले आणि दोन वर्षांत ते भारत, फिलीपिन्स आणि मलेशियाचे देश प्रमुख झाले. भारतातील ई-कॉमर्स व्यवसाय झपाट्याने वाढणार असल्याची त्यांना कल्पना होती. पण eBay ला भारतीय व्यवसायात गुंतवणूक करायची नव्हती, म्हणून त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला.

2012 मध्ये स्वत:ची कंपनी

अंबरीश मूर्ती यांनी 2012 मध्ये आशिष शाह यांच्यासोबत पेपरफ्राय या फर्निचर आणि होम डेकोरसाठीच्या एक ई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली. हा व्यवसाय आणि प्रयत्न सफल होईल, याची त्यांनाही खात्री नव्हती. पण, वर्षभरात फर्निचर आणि होम डेकोर व्यवसायात त्यांनी चांगली पकड बनवली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget