भारतातील कांदा निर्यातबंदीचा फटका परकीय देशांनाही, 'या' देशांमध्ये 'दर' वाढणार
कांद्याच्या (Onion) बाबतीत केंद्र सरकारनं (Central Govt) मोठा निर्णय घेतलाय. कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चनंतरही कायम राहणार असल्याचं सरकारनं (Govt) सांगितलंय.
Onion Export Ban : कांद्याच्या (Onion) बाबतीत केंद्र सरकारनं (Central Govt) मोठा निर्णय घेतलाय. कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चनंतरही कायम राहणार असल्याचं सरकारनं (Govt) सांगितलंय. पुढील आदेश येईपर्यंत अनिश्चित काळासाठी ही निर्यातबंदी कायम असणार आहे. दरम्यान, एकीकडे या निर्यातबंदीचा देशात कांद्याच्या दरावर परिणाम झालाय. कांद्याचे दर कमी झालेत. तर दुसरीकडं इतर देशांवर देखील कांदा निर्यातबंदीचा परिणाम झालाय. या निर्यातबंदीमुळं काही देशांमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
8 डिसेंबर 2023 पासून सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे
कांद्यावर निर्यातबंदी (Onion Export Ban) घातल्यापासून देशात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. 8 डिसेंबर 2023 पासून सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी 31 मार्चपर्यंत राहणार असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. पण आता ही निर्यातबंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असल्याचे सरकारनं सांगितले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. निर्यातबंदीचा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचा फटका अनेक देशांना देखील बसू शकतो. त्यांच्या बाजारपेठेत कांद्याच्या दर वाढण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
या देशांमध्ये कांद्याच्या दरात वाढ होणार?
दरम्यान, भारत हा कांद्याचा मोठा निर्यातदार देश आहे. देशातून मोठ्या प्रमाणावर इतर देशांमध्ये कांद्याची निर्यात केली जाते. अनेक देश कांद्याच्या बाबतीत भारतावर अवलंबून आहेत. पण सरकारनं निर्यातबंदी केल्यामुळं त्या देशांमध्ये कांद्याचा तुटवडा भासत आहे. भारताकडून बांगलादेश, नेपाळ, UAE, मलेशिया हे देश मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करतात. पण भारताना कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळं या देशांमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यचता निर्माण झाली आहे.
4000 ते 4500 रुपये प्रति क्विंटलने 1000 रुपयांवर
महाराष्ट्राचा विचार केला तर कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण झाली आहे. 4000 ते 4500 रुपये प्रति क्विंटलने जाणारा कांदा सध्या 1000 ते 1200 रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. त्यामुळं सरकारनं घेतलेल्या कांदा निर्यातबंदीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, 31 मार्चनंतर तरी सरकार कांद्यावरील निर्यातबंदी उठवेल अशी शक्यता होती. मात्र, ही शक्यता आता मावळली आहे. सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी कायम ठेवली आहे.
महत्वाच्या बातम्या: