क्रिप्टो बाजाराने घेतला ओमायक्रॉनचा धसका! बिटकॉईनचे दर 10 हजार डॉलरपर्यंत कोसळले
Crypto Market: ओमायक्रॉन व्हेरियंटचे सावट क्रिप्टो बाजारावरही दिसून आले. क्रिप्टो बजारात मोठी विक्री झाल्याने दर खाली आले.
Omicron affect on Crypto Market: जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंटचा (omicron variant) वाढता धोका आणि भारतात क्रिप्टोकरन्सीबाबतच्या धोरणावर चर्चा सुरू असताना शनिवारी क्रिप्टो बाजारात मोठी उलथापालथ झाली. CoinGeckoनुसार, बिटकॉइनसह इतर दुसऱ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये शनिवारी मोठी घसरण झाली. क्रिप्टो बाजारात गुंतवणुकदारांनी ओमायक्रॉनमुळे येणाऱ्या संभाव्य आर्थिक संकटामुळे मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याने दर कोसळले असल्याचे म्हटले जाते.
जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिप्टो बिटकॉइनमध्ये 17 टक्क्यांची घसरण दिसून आली. एका क्षणी बाजारात बिटकॉइनने 42000 हजार डॉलर इतका नीचांकी स्तर गाठला होता. भारतीय रुपयांनुसार, क्रिप्टोचा दर 31.70 लाख प्रति बिटकॉइनच्या स्तरापर्यंत आला होता.
सुरुवातीला जवळपास 10 हजार डॉलरने दर कोसळल्यानंतर बिटकॉइनचा दर पुन्हा सावरू लागला आणि 47700 डॉलर इतक्या स्तरावर पोहचला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी इथेरियमच्या दरातही 15 टक्क्यांची घट दिसून आली. इथेरियमचा दर हा 3900 डॉलर इतक्या पातळीवर आला. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे क्रिप्टोबाजारात घसरण झाली असल्याची चर्चा आहे.
बिटकॉइनमध्ये घसरण
10 नोव्हेंबर रोजी 69,000 डॉलरच्या पातळीला स्पर्श केल्यापासून, बिटकॉइनमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आतापर्यंत सुमारे 21,000 डॉलरची घसरण झाली आहे. शिवाय, एथेरियम ब्लॉकचेनशी संबंधित सिक्का आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिप्टो इथरमध्ये शनिवारी 15.9 टक्क्यांनी घसरण झाली.
येत्या काही दिवसांमध्ये व्याज दरात वाढ करण्याचे संकेत अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने दिले आहेत. क्रिप्टोबाजारात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कार्डेनो, सोलाना पॉलीगॉन आणि शिबा इनूमध्ये 13 ते 20 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Bank Strike : खासगीकरणाविरोधात बँका दोन दिवसांच्या संपावर; 'या' दोन दिवशी व्यवहार होणार ठप्प
- सरकार देणार दरमहा 3000 रुपये; नोव्हेंबर महिन्यात 46 लाखजणांनी केली नोंदणी, जाणून घ्या योजना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha