एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Petrol Diesel Rates Today: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता; तेल कंपन्यांनी दिले संकेत, सांगितलं मोठं कारण...

Petrol Diesel Rates Today: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Rates: सामान्यांसाठी एक आनंदाची बातमी. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rates Today) कमी होण्याची शक्यता आहे. तेलकंपन्यांनी तसे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले होते. पण तरीही भारतात इंधनाचे दर वाढवण्यात आले नाहीत. यामुळे तेल कंपन्यांना बरंच नुकसान सोसावं लागत होतं. नंतर तेलाचे दर स्थिरावल्यावर इंधनाचे दर कमी करण्यात आले नाहीत. कारण तेल कंपन्या आपलं नुकसान भरून काढत होत्या. आता या नुकसानाची वसुली बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. तसंच, तेल कंपन्यांचा ताळेबंदही नफ्यात आला आहे आणि म्हणूनच, येत्या काही दिवसांत तेलाचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम मंत्रालयाकडून पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करण्याच्या तेल कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तेल कंपन्या देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याच्या विचारात आहे. 

जागतिक बाजारातील पुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच कंपन्यांचा तोटा देखील भरुन निघाला आहे. अशातच तेल कंपन्यांना मागील तिमाहीत चांगला फायदाही झाला आहे. याशिवाय तेल कंपन्यांना विक्रीतून चांगला नफाही होत आहे. नफ्याचा फायदा सर्वसामान्य नागरीकांना देखील मिळावा यासाठीच पेट्रोलियम मंत्रालयानं पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळत आहे. 

कच्च्या तेलाच्या किमती काय? 

ब्रेंट क्रूड तेल 0.16 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 76.90 डॉलरवर व्यापार करत आहे. तसेच, डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 0.04 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 72.50 डॉलरवर व्यापार करत आहे. दरम्यान, देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल करण्यात आला आहे. काही ठिकाणी तेल महाग झालं आहे तर काही ठिकाणी इंधन स्वस्त झालं आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. नव्या दरांनुसार, आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशातच आज तुम्ही तुमच्या गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या. 

आज देशातील महानगरांत किमती स्थिर

देशाची राजधानी नवी दिल्लीसह महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे, अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांत किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे आणि अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरांत काही प्रमाणात घटही नोंदवण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय  राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही भिन्न असतात.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray MNS Symbol :राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार?Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...Deepak Kesarkar on Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं- दीपक केसरकरRashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
Embed widget