(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nykaa IPO Subscription: Nykaa चा IPO आजपासून ओपन; पाहा शेअर्सची किंमत
Nykaa IPO: Nykaa कंपनीचा IPO चा भाग आज ओपन झाला असून तो 1 नोव्हेंबरला बंद होणार आहे.
Nykaa IPO: Nykaa कंपनीचा मालकी हक्क असणारी कंपनी FSN E-Commerce Venturesचा 5,352 करोड रूपयांचा IPO आज ओपन झाला आहे. कंपनीचा IPO चा भाग आज ओपन झाला असून तो 1 नोव्हेंबरला बंद होणार आहे. Nykaa च्या IPO च्या भागाची ब्रॅंड प्राइस 1085-1125 रूपये प्रति शेअर आहे. यानुसार कंपनीचे व्हॅल्यूएशन 52,574 कोटी रूपये होते. कंपनीच्या 5,352 कोटी रूपयांपैकी 630 कोटी IPO हे फ्रेश आहे. तसेच 4,197 कोटी रूपये शेअर ऑफरमध्ये फॉर सेल म्हणून विकले जातील.
कशी असेल गुंतवणूक
Nykaa कंपनीकडे ब्रोकरेज हाउस हे सकारात्मक दृष्टीने पाहात आहेत. हे ब्रोकरेडज हाऊस नायका कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देतात. तसेच Marwadi Shares and Finance चे गुंतवणूक सावध राहून गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. ब्रोकरेज फर्ममध्ये Nykaa च्या शेअर्सला "Subscribe with caution" रेटिंग देत आहेत.
जून 2021 मध्ये गेल्या 12 महिन्यांच्या आधारावरील शेअर्सनंतर कंपनीचा अॅडजस्टेड EPS 2.54 रुपये आहे. शेअर्सच्या किंमतीनुसार Nykaa ची लिस्टिंग 443.45 P/E वर होईल आणि याचा मार्केट कॅप 53,204 करोड रूपये होईल. ब्रोकरेज फर्म यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितले, 'कंपनी ही लीडिंग लाइफ स्टाइल फोकस कंज्यूमर टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म आहे. कंपनीचे व्हॅल्यूएशन हे आधीच्या वित्तीय स्थितीवर आधारीत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीने गुंतवणूक करावी.'
खुशखबर! घर घेणं स्वस्त झालं, युनियन बँक ऑफ इंडियाच्या होम लोन व्याजदरात कपात
Nykaa बद्दल Hem Securities यांचे मत आहे की, ब्यूटी आणि पर्सनल केअर मार्केटमध्ये Nykaa साठी ही सर्वात मोठी संधी आहे. 2025 पर्यंत Nykaa कंपनीची ग्रोथ प्रत्येक वर्षी 12% च्या दराने होईल. तसेच जास्तीची सूट न देता कंपनीने चांगली ग्रोथ केली आहे.Nykaa ने अॅंकर इनवेस्टर्सकडून 2400 कोटी रूपये जमा केले आहेत.
Home Loan: पोस्ट ऑफिसकडून दिवाळी भेट! आता ग्रामीण भागातील ग्राहकांनाही मिळणार होम लोन