एक्स्प्लोर

New India Cooperative Bank case : 122 कोटीतील 70 कोटी हितेश मेहतापर्यंत पोहोचले, पोलिसांना संशय, तर या प्रकरणात आमदार राम कदम यांचाही समावेश, आप चा आरोप 

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील (New India Cooperative Bank case) आरोपी हितेश मेहतापर्यंत गैरव्यवहारातील 70 कोटी रुपये पोहचल्याचा पोलिसांना संशय आहे.

New India Cooperative Bank case : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील (New India Cooperative Bank case) आरोपी हितेश मेहतापर्यंत गैरव्यवहारातील 70 कोटी रुपये पोहचल्याचा पोलिसांना संशय आहे. या गैरव्यवहाराबाबत मेहताने रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना तशी कबूली जबाब दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राथमिक तपासणीत 2024  मध्ये मेहतापर्यंत एकूण 2 कोटींचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान,  न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत भाजप नेते राम कदम यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली असल्याचा आरोप आदमी आदमी पार्टीने केला आहे. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील 70 कोटी रुपये आरोपी हितेश मेहताकडे अद्याप असल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत. 

सहकारी बँक बंद पाडण्यात भाजप नेते जबाबदार

दरम्यान, सहकारी बँक बंद केल्याबद्दल आम आदमी पार्टीने भाजप नेत्यांना जबाबदार धरले. महाराष्ट्रातील बहुतांश सहकारी बँका किंवा पतसंस्थांमध्ये राजकीय पक्ष आणि राजकारण्यांचा हस्तक्षेप असल्याची टीका आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केली आहे. जेव्हा जास्त खासगी बँका नव्हत्या आणि सामान्य लोकांनी इथं खाती उघडली होती तेव्हा हे सुरु झाले. पण आज या बँका भ्रष्टाचाराचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळेच या सर्व बँका  बंद पडत आहेत असं मत धनंजय शिंदे यांनी व्यक्त केलं.

मुंबई बँक प्रकरणात प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचे नाव पुढे 

मुंबई बँकेचे प्रकरण समोर आले होते. त्याविरोधात आम्ही आवाज देखील उठवला होता. त्यात भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचे नाव पुढे आले होती असे धनंजय शिंदे म्हणाले. तसेच बंद पडलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत भाजप नेते राम कदम यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही याबाबत माहिती संकलित करत असून लवकरच ती लोकांसमोर मांडणार असल्याचे धनंजय शिंदे म्हणाले. 

दरम्यान, न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या 30 पेक्षा जास्त शाखा आहेत. बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यासह तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. तसेच  या बँकेवर ‘प्रशासक’ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला देण्यात आले. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. 

 

महत्वाच्या बातम्या:

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळा! मॅनेजर हितेश मेहताला अटक, 122 कोटीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
Finolex Cables : मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी, जाणून घ्या कारण
मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Embed widget