(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेटीएमच्या संस्थापकाच्या रतन टाटांवरील पोस्टमुळे लोकांमध्ये संताप, विजय शेखर शर्मा नेमंक काय म्हणाले?
Ratan Tata : रतन टाटा यांच्या निधनानंतर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र विजय शेखर यांच्या शोकसंदेशावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई : टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata Death) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर 09 ऑक्टोबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. उद्योगविश्वासापासून ते सामान्य माणसापर्यंत सर्वांनीच रतन टाटा (Ratan Tata) यांना जड अंत:करणाने शेवटचे अभिवादन केले. दरम्यान, रतन टाटा यांच्या निधनानंतर पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी एक्स या समाजमाध्यम खात्यावर केलेल्या पोस्टमुळे लोक संताप व्यक्त करत आहे. लोकभावनेचा आदर करून नंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आहे.
विजय शेखर शर्मा यांच्यावर नाराजी
निधनानंतर जगभरातील लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनीदेखील रतन टाटा यांना एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली. मात्र ही आदरांजली अर्पण करताना त्यांनी वापरलेल्या शब्दांमुळे नेटकरी त्यांच्यावर भडकले आहेत. पुढे वाद होण्याची शक्यता लक्षात घेत विजय शर्मा यांनी ही पोस्ट डिलीट केली.
wtf is the last line pic.twitter.com/dOrIeMQH7c
— Shivam Sourav Jha (@ShivamSouravJha) October 10, 2024
विजय शेखर शर्मा यांनी नेमकं काय लिहिलं होतं?
विजय शेखर शर्मा यांनी रतन टाटा यांचे कौतुक करणाऱ्या चार ओळी लिहिल्या होत्या. तसेच रतन टाटा यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं होतं. मात्र त्यांनी लिहिलेल्या या शोकसंदेशातील शेवटच्या ओळीवर अनेकांनी आक्षेप व्यक्त केला. त्यांच्या याच पोस्टचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 'रतन टाटा हे एक लिजेंड असून ते प्रत्येक पिढीला प्रेरित करतील. भविष्यातील उद्यमी यापुढे भारतातील एका विनम्र उद्योजकाला भेटू शकणार नाहीत. सलाम सर' असे विजय शर्मा आपल्या संदेशात म्हणाले होते. तर शेवटच्या ओळीत त्यांनी 'ओके टाटा बाय बाय' असं म्हणत एक अश्रू गाळणारा इमोजी दिला होता. त्यांच्या ओके टाटा बाय बाय या शब्दांवर नेटकऱ्यांनी आक्षेप व्यक्त केला. लोकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर विजय शेखर शर्मा यांनी ही पोस्ट हटवली.
हेही वाचा :
पुन्हा पडणार पैशांचा पाऊस, 16 ऑक्टोबर रोजी येणारा 'हा' आयपीओ देणार तब्बल 55 टक्क्यांनी रिटर्न्स?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?