एक्स्प्लोर

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं? अंबानी-अदानींपेक्षा कितीतरी जास्त आहे संपत्ती  

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? एक असं कुटुंब ज्या कुटुंबाची संपत्ती ही मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यापेक्षी कितीतरी जास्त आहे.

World Richest Family : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दोन नावं आघाडीवर आहेत. ती म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani). मात्र, जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? एक असं कुटुंब ज्या कुटुंबाची संपत्ती ही मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यापेक्षी कितीतरी जास्त आहे. हे कुटुंब एलन मस्कपेक्षाही खूप श्रीमंत आहे.

नाहयान रॉयल फॅमिली सर्वात श्रीमंत

अहमदाबादमध्ये येते नुकतील 'व्हायब्रंट गुजरात समिट-2024' संपन्न झाली. ज्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (Mohammed bin Zayed Al Nahyan) हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते. अहमदाबादमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत रोड शोही केला. त्यांचे 'नाहयान रॉयल फॅमिली' ( Nahyan Royal Family)  हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे.

नाहयान कुटुंबाची एकूण मालमत्ता किती?

अबुधाबीच्या अमिरातीचे राजघराणे म्हणजेच ‘नाहयान फॅमिली’ 2023 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब बनले. त्याने या प्रकरणात वॉलमार्ट इंकचे मालक वॉल्टन कुटुंबालाही मागे सोडले. UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे सध्या या कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 305 अब्ज डॉलर्स (सुमारे 25.38 लाख कोटी रुपये) आहे. तर वॉल्टन कुटुंबाची एकूण संपत्ती 232.2 अब्ज डॉलर्स (सुमारे 19.31 लाख कोटी रुपये) आहे.

एलन मस्कपेक्षाही जास्त संपत्ती

वैयक्तिकरित्या, टेस्लाचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण एकूण निव्वळ संपत्ती बघितली तर एलन मस्कची संपत्ती नाहयान कुटुंबाच्या तुलनेत कुठेही नाही. एलन मस्क यांची संपत्ती 222 अब्ज डॉलर (सुमारे 18.46 लाख कोटी रुपये) आहे.

अंबानी-अदानींच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त

नाहयान रॉयल फॅमिलीची संपत्ती इतकी आहे की, ती भारतातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीच्या कितीतरी पटीने जास्त आहे. मुकेश अंबानी कुटुंबाची संपत्ती 101 अब्ज डॉलर (सुमारे 8.4 लाख कोटी रुपये) आहे आणि गौतम अदानी कुटुंबाची संपत्ती 91.8 अब्ज डॉलर (सुमारे 7.63 लाख कोटी रुपये) आहे. अशाप्रकारे दोघांची एकूण संपत्ती केवळ 16 लाख कोटी रुपये आहे. या दोघांच्या संपत्तीपेक्षा कितीतरी जास्त संपत्ती ही नाहयान रॉयल फॅमिलीची आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानींना टाकलं मागे; अदानींची संपत्ती किती? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका! आशियामधील चौथा सर्वात मोठा पार्टनर असूनही घेतला निर्णय
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका!
Smita Patil : सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 News : City 60 News : Maharashtra News : 14 Dec 2024 : ABP MajhaNrusinhawadi Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत जन्मकाळ सोहळ्याचा देखावाPune Datta Jayanti 2024 : पुण्यात दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी ABP MajhaNarsobachi Wadi Datta Jayanti : दत्तजयंतीनिमित्त नरसोबाच्या वाडीत गर्दी, दर्शनासाठी रांग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका! आशियामधील चौथा सर्वात मोठा पार्टनर असूनही घेतला निर्णय
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका!
Smita Patil : सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
Ind vs Aus 3rd Test : पाऊस करणार टीम इंडियाचा गेम! गाबा कसोटी ड्रॉ झाल्यास WTC समीकरण बिघडणार, जाणून घ्या कुठं होणार खेळखंडोबा?
पाऊस करणार टीम इंडियाचा गेम! गाबा कसोटी ड्रॉ झाल्यास WTC समीकरण बिघडणार, जाणून घ्या कुठं होणार खेळखंडोबा?
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली अंतिम यादीवर दिल्लीत शिक्कामोर्तब, नागपुरात उद्या शपथविधी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली अंतिम यादीवर दिल्लीत शिक्कामोर्तब, नागपुरात उद्या शपथविधी
Embed widget