एक्स्प्लोर
Stock Market: तीन वर्षात 1700 टक्के रिटर्न, संरक्षण क्षेत्रातील कंपनीच्या शेअरची विभागणी, वर्षभरात 100 टक्के तेजी
Share Market : माझगांव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअरमध्ये वर्षभरात 100 ट्केक तेजी पाहायला मिळाली आहे. या शेअरची विभागणी डिसेंबर महिन्याच्या शेवटी होणार आहे.

शेअर मार्केट अपडेट
1/5

संरक्षण क्षेत्रातील कंपनी माझगांव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर विभागला जाणार आहे. कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत 5 रुपये होणार आहे.
2/5

या कंपनीनं शेअर बाजारात माहिती दिली असून 10 रुपये दर्शनी किंमत असणाऱ्या शेअरला दोन भागांमध्ये विभागलं जाईल.
3/5

माझगांव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्सची विभागणी 27 डिसेंबर 2024 रोजी केली जाणार आहे. या कंपनीनं ऑक्टोबरमध्ये गुंतवणूकदारंना 23.19 रुपये लाभांश दिला होता. सप्टेंबरमध्ये 12.11 रुपये लाभांश दिला होता.
4/5

गेल्या महिन्याभरात माझगांव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअरमध्ये 20 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर 4965 रुपयांवर आहे.
5/5

सहा महिन्यांपासून ज्यांच्याकडे माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर आहे त्यांना 53 टक्के परतावा मिळाला आहे. तर, 2024 मध्ये या कंपनीच्या शेअरनं 115 टक्के परतावा दिला आहे. दोन वर्षात 457.95 टक्के तर 3 वर्षात 1736 टक्के परतावा दिला आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 12 Dec 2024 03:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
हिंगोली
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion