गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानींना टाकलं मागे; अदानींची संपत्ती किती?
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
Gautam Adani : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. इतकेच नाही तर गौतम अदानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. ते जगातील 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ झाली आहे. त्याच्या संपत्तीत गेल्या 24 तासात 7.6 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 12 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर घसरले आहेत.
गौतम अदानी यांची एकूण संपत्ती किती?
ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानींची संपत्ती 97 अब्ज डॉलर्स आहे. गेल्या 24 तासांत त्याची एकूण संपत्ती 665 दशलक्षने वाढली आहे. अदानी समूहाचा मालक आणि आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आले आहेत. गुरुवारपर्यंत अदानी या यादीत 14 व्या क्रमांकावर होते. मात्र गेल्या 24 तासांत त्याने केलेल्या प्रचंड कमाईमुळे त्याच्या नेट वर्थमध्ये चांगली वाढ झाली आहे. ते आता 14 व्या स्थानावरून 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत. ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 97.6 अब्ज डॉलर एवढी झाली आहे.
गौतम अदानी यांची संपत्ती एवढ्या वेगाने का वाढली?
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं कंपनीचे मूल्य वाढत आहे. अशा परिस्थितीत गौतम अदानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. याप्रकरणी सेबीचा तपास योग्य मार्गावर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच, बाजार नियामक सेबीला 24 पैकी उर्वरित 2 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आणखी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
अदानी समूहाचे शेअर्स वाढले
गेल्या दोन दिवसांच्या वाढीसोबतच शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्येही जोरदार वाढ दिसून आली आहे. BSE वर ACC सिमेंटचे शेअर्स 3.20 टक्क्यांनी वाढून 2,352 रुपये प्रति शेअर झाले यासह अदानी पोर्ट सुमारे 3 टक्के, अदानी पॉवर 2 टक्के, अदानी टोटल गॅस 2 टक्के, अदानी विल्मर शेअर 0.12 टक्के, अंबुजा सुमारे 3 टक्क्यांनी वाढले. तर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 0.18 टक्क्यांनी घसरले. याशिवाय अदानी एनर्जी सोल्युशन्स 0.41 टक्के आणि अदानी एनर्जी 0.43 टक्क्यांनी घसरले.
महत्त्वाच्या बातम्या: