Nrusinhawadi Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत जन्मकाळ सोहळ्याचा देखावा
Nrusinhawadi Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत जन्मकाळ सोहळ्याचा देखावा
आज दत्त जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. आज संध्याकाळी ६ वाजता दत्तगुरुंचा जन्मसोहळा पार पडतोय. यानिमित्त राज्यातील अनेक मंदिरात सजावट करण्यात आलीये. कोल्हापुरातील नृसिंहवाडी येथे दत्त जयंती निमित्त भाविकांची गर्दी झालीय. कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिरात दाखल झाले होते. तर तिकडे पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरालगत असलेल्या दत्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीये. तसंच दत्तांच्या मुर्तीला ३ किलो सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आलंय. तसंच पुणेकरांनीही दर्शनासाठी सकाळपासून मोठी गर्दी केलीये. तर सोलापुरातील अक्कलकोटमध्येही दत्त जयंतीनिमित्त भक्तांची मंदियाळी पहायला मिळाली. शिर्डीच्या साई मंदिरात दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झालीये.. मोठ्या संख्येने भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झालेत.साई मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीये.. तर साईमूर्तीला विविध आभूषण घालण्यात आले.